TRENDING:

Cancer : कॅन्सरला पहिल्याच स्टेजमध्ये हरवण्यासाठी 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; शरीर देतंय 'या' धोक्याच्या सूचना

Last Updated:
कॅन्सर (कर्करोग) हे नाव ऐकलं की आजही अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. पण तुम्हाला माहितीये का? कॅन्सर हा सुरुवातीलाच जीवघेणा नसतो. तो विकसित होण्यापूर्वी आपलं शरीर आपल्याला काही खास संकेत देत असतो. जर आपण वेळीच शरीराची ही 'भाषा' ओळखली, तर पहिल्याच टप्प्यात (Stage 1) या आजाराला पूर्णपणे हरवणं शक्य आहे.
advertisement
1/8
शरीर देतं धोक्याच्या सूचना, कॅन्सरला हरवण्यासाठी या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
आजच्या धावपळीच्या जीवनात लोक इतके व्यस्त असतात की त्यांना स्वत:कडे पाहायला देखील वेळ नसतो. अंगावर एखादी गाठ दिसली, अंग दुखत असेल तरी आपण काय करतो? 'उद्या बघू', 'कदाचित कामाच्या ताणामुळे असेल' किंवा 'एखाद्या घरगुती उपायाने बरं वाटेल' असं म्हणून आपण त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो. पण मित्रांनो, हीच 'उद्या बघू'ची वृत्ती कधीकधी जीवावर बेतू शकते.
advertisement
2/8
कॅन्सर (कर्करोग) हे नाव ऐकलं की आजही अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. पण तुम्हाला माहितीये का? कॅन्सर हा सुरुवातीलाच जीवघेणा नसतो. तो विकसित होण्यापूर्वी आपलं शरीर आपल्याला काही खास संकेत देत असतो. जर आपण वेळीच शरीराची ही 'भाषा' ओळखली, तर पहिल्याच टप्प्यात (Stage 1) या आजाराला पूर्णपणे हरवणं शक्य आहे.
advertisement
3/8
स्टेज 1 कॅन्सर म्हणजे नक्की काय?जेव्हा कॅन्सरचा ट्यूमर (गाठ) आकाराने लहान असतो आणि तो ज्या अवयवात सुरू झाला, तिथेच मर्यादित असतो, तेव्हा त्याला 'स्टेज 1 कॅन्सर' म्हणतात. या टप्प्यावर तो शरीराच्या इतर भागांत किंवा लिम्फ नोड्समध्ये पसरलेला नसतो. तज्ज्ञांच्या मते, जर या टप्प्यावर उपचार सुरू झाले, तर रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता 100 टक्क्यांपर्यंत असते. इथे शस्त्रक्रिया करून तो भाग काढून टाकणं सोपं असतं आणि त्याचे साईड इफेक्ट्सही नगण्य असतात.
advertisement
4/8
शरीर देतंय 'या' 7 धोक्याच्या घंटा; चुकूनही दुर्लक्ष करू नकाकॅन्सरची लक्षणं तो कोणत्या प्रकारचा आहे यावर अवलंबून असतात, पण काही सामान्य बदल आपण सर्वांनीच लक्षात ठेवायला हवेत:शरीरावर गाठ येणे: छाती, मान, बगलेत किंवा जांघेत एखादी नवीन गाठ किंवा सूज जाणवत असेल, तर सावध व्हा. विशेषतः स्तनाचा कॅन्सर किंवा लिम्फोमाची सुरुवात अशा छोट्या गाठींनी होते. त्यात वेदना होत नसली तरी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.तुमच्या अंगावरच्या तीळाचा रंग बदलतोय का? त्याचा आकार वाढतोय का? किंवा त्वचेवर एखादी जखम जी बरीच होत नाहीये? असे बदल त्वचेच्या कॅन्सरचे संकेत असू शकतात.
advertisement
5/8
अचानक वजन कमी होणे: तुम्ही डाएट करत नाहीये, व्यायामही वाढवलेला नाही, तरीही अचानक 5 ते 10 किलो वजन कमी झालं असेल, तर ही आनंदाची नाही तर चिंतेची बाब असू शकते. काही कॅन्सर शरीरातील ऊर्जा झपाट्याने शोषून घेतात.अतिशय थकवा जाणवणे: पुरेशी झोप आणि आराम करूनही जर तुम्हाला थकवा जाणवत असेल आणि शरीरातील सर्व शक्ती निघून गेल्यासारखं वाटत असेल, तर हे शरीर आतून कॅन्सरशी लढत असल्याचं लक्षण असू शकतं.
advertisement
6/8
सतत होणारे दुखणे: विनाकारण शरीराच्या एखाद्या भागात सतत वेदना होणे, विशेषतः हाडांमध्ये किंवा पोटात नेहमी अस्वस्थ वाटणे हे यकृत (Liver) किंवा हाडांच्या कॅन्सरचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.
advertisement
7/8
पचनसंस्थेतील बदल: सतत बद्धकोष्ठता (Constipation), वारंवार शौचाला होणे, पोट फुगणे किंवा जेवल्यानंतर लगेच पोट भरल्यासारखे वाटणे या गोष्टींकडे लक्ष द्या. गिळताना त्रास होणे हे देखील एक महत्त्वाचे लक्षण आहे.खोकल्यातून रक्त येणे, लघवी किंवा विष्ठेवाटे रक्त पडणे किंवा मासिक पाळी नसतानाही रक्तस्त्राव होणे हे धोक्याचे लक्षण आहे.
advertisement
8/8
लक्षात ठेवा: भीती नको, खबरदारी हवीवरीलपैकी एकही लक्षण दिसल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण ही लक्षणं इतर सामान्य आजारांचीही असू शकतात. मात्र, ती अंगावर न काढता तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं हाच सुज्ञपणा आहे. कॅन्सरविरुद्धच्या लढाईत 'लवकर निदान' हेच सर्वात मोठं शस्त्र आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cancer : कॅन्सरला पहिल्याच स्टेजमध्ये हरवण्यासाठी 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; शरीर देतंय 'या' धोक्याच्या सूचना
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल