TRENDING:

SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला

Last Updated:
सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 156 धावा केल्या होत्या. आणि लखनऊ सूपर जाएटसने हे आव्हान 5 विकेट राखून पूर्ण करत सामना जिंकला आहे.
advertisement
1/9
 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
आयपीएलमध्ये आज लखनऊ सूपर जाएटसने सनरायझर्स हैदराबादचा 5 विकेट राखून पराभव केला आहे. या विजयाचा शिल्पकार रिषभ पंत ठरला आहे.कारण त्याने 68 धावांची नाबाद खेळी केली होती.
advertisement
2/9
सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 156 धावा केल्या होत्या. आणि लखनऊ सूपर जाएटसने हे आव्हान 5 विकेट राखून पूर्ण करत सामना जिंकला आहे.
advertisement
3/9
सनरायजर्स हैदराबादने दिलेल्या 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ सूपर जाएटची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण मिचेल मार्श 14 वर बाद झाला होता.
advertisement
4/9
मिचेल मार्श बाद झाल्यानंतर रिषभ पंत मैदानात आला होता. यावेळी त्याच्यासोबत एडन मार्करम होता. यावेळी मार्करम 45 वर बाद झाला.
advertisement
5/9
मार्करम बाद झाल्यानंतर आयुष बदोनी 12 वर बाद झाला होता. त्याच्यानंतर निकोलस पुरन 1 धावांवर रनआऊट झाला होता.त्यामुळे अब्दुल समद मैदानात आला होता.
advertisement
6/9
पण अब्दुल समद बाद झाला मग रिषभ पंत एकट्याने 68 धावांची नाबाद मॅच विनिंग खेळी करून लखनऊ सूपर जाएटसला 5 विकेट राखून सामना जिंकून दिला होता.
advertisement
7/9
दरम्यान या सामन्यात जरी रिषभ पंतच्या 68 धावांच्या मॅचविनिंग खेळीनंतर लखनऊ सूपर जाएटसने सामना जिकंला असला तरी या विजयाचा खरा हिरो वेगळाच आहे.
advertisement
8/9
या विजया मागचा खरा हिरो हा मोहम्मद शमी होता.ज्याने लखनऊने 10 कोटीला ताफ्यात घेतलं होतं. हा एकटा खेळाडू अभिषेक शर्मा (14 कोटी), ट्रेविस हेड (14 कोटी), ईशान किशन (11.25 कोटी), लियाम लिविंगस्टन (13 कोटी), हेन्री क्लासमे (23 कोटी),नितीश रेड्डी (6 कोटी) या जवळ जवळ 81.25 खेळाडूवर भारी पडला होता.त्याने यापैकी अनेक खेळाडूंना धावा काढून दिल्या नाही तर काहींच्या विकेटही काढल्या होत्या.त्यामुळे ही मॅच फिरली होती.
advertisement
9/9
सनरायझर्स हैदराबादकडून हेनरीक क्लासेनने 62 धावांची सर्वाधिक खेळी केली होती.त्याच्यासोबत नितीश कुमार रेड्डीने 56 धावा केल्या होत्या.या धावांच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने 9 विकेट गमावून 157 धावा केल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल