TRENDING:

T20 World Cup : 'मला फक्त या गोष्टीची भीती वाटतीये', MS Dhoni ने सूर्याला वॉर्निंग देत सांगितली सर्वात डेंजर टीम!

Last Updated:
MS Dhoni On Team India in T20 World Cup : मला फक्त एका गोष्टीची चिंता वाटतीये, ती म्हणजे मैदानातील दवाची... मला सर्वात जास्त कोणत्या एका गोष्टीची तिरस्कार वाटत असेल तर तो म्हणजे दव... कारण मॅचमध्ये दवामुळे अनेक गोष्टी बदलतात, असं मत धोनीने व्यक्त केलं.
advertisement
1/7
T20 World Cup : 'मला फक्त या गोष्टीची भीती वाटतीये', MS Dhoni काय म्हणाला?
सध्याच्या परिस्थितीत मला सर्वात डेंजर टीम कोणती वाटत असेल तर ती भारतीय टीम आहे. एका चांगल्या टीममध्ये ज्या ज्या काही क्विलिटी लागत असतात, ते सर्व या टीम इंडियामध्ये आहे, असं म्हणत धोनीने टीम इंडियाचं कौतूक केलं.
advertisement
2/7
टीममध्ये सर्वात महत्त्वाचा असणारा अनुभव देखील आहे. भारतीय टीमला दबावाखाली खेळी शकते. त्याचा अनुभव बऱ्याच खेळाडूंना आहे. बऱ्याच काळापासून ते त्याप्रकारे खेळत देखील आहेत, असंही धोनी म्हणाला.
advertisement
3/7
मला फक्त एका गोष्टीची चिंता वाटतीये, ती म्हणजे मैदानातील दवाची... मला सर्वात जास्त कोणत्या एका गोष्टीची तिरस्कार वाटत असेल तर तो म्हणजे दव... कारण मॅचमध्ये दवामुळे अनेक गोष्टी बदलतात, असं मत धोनीने व्यक्त केलं.
advertisement
4/7
मी जेव्हा टीम इंडियासाठी सुद्धा खेळायचो, तेव्हाही मला कशाची भीती वाटली असेल, तर ती दवाची होती. अशावेळी टॉसची भूमिका महत्त्वाची ठरते, असं म्हणत महेंद्रसिंग धोनीने सूर्याला महत्त्वाचा सल्ला दिला.
advertisement
5/7
जर परिस्थिती तटस्थ असेल आणि आपण 10 मॅच सर्वात उत्तम टीमविरुद्ध खेळलो. तर बहुतेकवेळा विजय हा आपल्या पारड्यात जातो. पण इथं काही वेळा परिस्थिती आणि खेळाडूंचा रोल महत्त्वाचा असतो.
advertisement
6/7
कधी आपला बेस्ट खेळाडू फेल ठरतो आणि विरोधी खेळाडूचा दिवस असतो, तेव्हा गेम चेंज होतो. तसेच प्रत्येक खेळाडूने दुखापतीमधून सावरलं पाहिजे आणि आपली भूमिका निभावण्याची गरज असते, असं धोनी म्हणाला.
advertisement
7/7
दरम्यान, मला आत्ता काहीही बोलून अपशकुन करायचा नाहीये. पण नक्कीच टीम इंडियाचा संघ धोकादायक संघांपैकी एक आहे, असं महेंद्रसिंग धोनी म्हणाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : 'मला फक्त या गोष्टीची भीती वाटतीये', MS Dhoni ने सूर्याला वॉर्निंग देत सांगितली सर्वात डेंजर टीम!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल