RCB च्या विजयानंतर हार्दिक पांड्याच्या डोळ्यात पाणी, काय म्हणाला Mumbai Indians चा कॅप्टन?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Hardik Pandya in Tears After RCB Win : रॉयल चॅलेजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सला पराभूत करत इंडियन प्रीमियर लीगचे आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं. या विजयात कृणाल पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
advertisement
1/5

आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेजर्स बंगळुरूने अफलातून कामगिरी करत पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. विराट कोहलीला 18 वर्षाच्या कष्टाचं फळ अखेर मिळालं.
advertisement
2/5
अशातच विजयानंतर विराट कोहलीने आरसीबीच्या विजयाच्या खऱ्या शिल्पकाराला क्रेडिट दिलं. कृणाल पांड्याच्या अफलातून कामगिरीमुळे आम्हाला सामना जिंकता आला, असं विराट कोहली म्हणाला होता.
advertisement
3/5
आरसीबीकडून खेळणाऱ्या कृणाल पांड्याने अंतिम सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करत 'प्लेयर ऑफ द मॅच' चा किताब पटकावला. त्याच्या या कामगिरीमुळे RCB ला ऐतिहासिक विजय मिळवता आला.
advertisement
4/5
अशातच आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या याने पोस्ट करत आपल्या लाडक्या भावाचं कौतूक केलंय. त्यावेळी पांड्याच्या डोळ्यात पाणी देखील आलं.
advertisement
5/5
दरम्यान, माझ्या डोळ्यात पाणी आलंय, तुझ्यावर गर्व आहे भावा... असं हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये लिहिलं आहे. त्यावेळी त्याने कृणालचा फोटो शेअर केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
RCB च्या विजयानंतर हार्दिक पांड्याच्या डोळ्यात पाणी, काय म्हणाला Mumbai Indians चा कॅप्टन?