IND vs PAK : पाकिस्तानने भारतावर बहिष्कार टाकून मोठी चूक केली, पहिल्या राऊंडमध्येच घरी जाणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टी20 वर्ल्ड सूरू व्हायला जवळपास आता 24 तासांचा कालावधी उरला आहे. पण अद्याप पाकिस्तानने भारताविरूद्धच्या घेतलेल्या बहिष्काराच्या भूमिकेतून माघार घेतलेली नाही आहे. त्यामुळे पाकिस्तान बहिष्कारावर ठाम असल्याचे दिसते.
advertisement
1/7

टी20 वर्ल्ड सूरू व्हायला जवळपास आता 24 तासांचा कालावधी उरला आहे. पण अद्याप पाकिस्तानने भारताविरूद्धच्या घेतलेल्या बहिष्काराच्या भूमिकेतून माघार घेतलेली नाही आहे. त्यामुळे पाकिस्तान बहिष्कारावर ठाम असल्याचे दिसते.
advertisement
2/7
पण पाकिस्तानची हीच भूमिका आता वर्ल्डकपमध्ये त्यांना भारी पडणार आहे.कारण पहिल्याच राऊंडमध्ये पाकिस्तानला घरी जावे लागणार आहे.त्यामुळे पाकिस्तानची अशी अवस्था नेमकी कशामुळे होणार आहे. हे जाणून घेऊयात.
advertisement
3/7
खरं तर पहिल्या राऊंडमध्ये प्रत्येक संघाला चार सामने खेळायचे आहेत. पण पाकिस्तानला भारताविरूद्ध पार पडणाऱ्या 15 फेब्रुवारीच्या सामन्यावर बहिष्कार टाकायचा आहे.त्यामुळे पाकिस्तान फक्त 4 पैकी 3 सामन्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे पाकिस्तानी कॅप्टन सलमान आगाने सांगितलं आहे.
advertisement
4/7
त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान फक्त नेदरलँड, युएस आणि नामिबिया या संघाविरूद्ध खेळणार आहे.या तीनही संघासोबत पाकिस्तानचे सामने हे कोलंबोच्या सिन्हालेस स्पोर्टस क्लब मैदानावर रंगणार आहे. या मैदानावरील तीन पैकी दोन सामन्यांवर पावसाचे सावट आहे.
advertisement
5/7
अॅक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या नेदरलँड विरूद्धच्या पहिल्या सामन्यात 64 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचे उर्वरीत दोन सामने देखील याच मैदानावर आहेत. जर पावसामुळे दोन सामने रद्द झाले तर पाकिस्तानला फक्त प्रत्येकी मॅच 1 गुण मिळणार आहे.
advertisement
6/7
त्यामुळे दोन सामन्यात दोन गुण आणि एका सामन्या दोन असे 4 गुण मिळतील. तसेच सामना रद्द झाल्याने नेट रनरेटमध्ये देखील फारसा फरक दिसणार आहे.त्यात भारताविरूद्धचा सामना हा कोलंबोच्या आर प्रेमादास स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात पावसाचे कोणतेही सावट नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या बहिष्कारामुळे भारताला फुकटात 2 गुण मिळणार आहे.
advertisement
7/7
जर असे झाल्यास पाकिस्तान 4 गुणांसह ग्रुप स्टेज म्हणजेच पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसणार आहेत.त्यामुळे पाकिस्तान आता काय भूमिका घेते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : पाकिस्तानने भारतावर बहिष्कार टाकून मोठी चूक केली, पहिल्या राऊंडमध्येच घरी जाणार