Asia Cup 2025 : टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचण्याआधी पाकिस्तानला मिरची झोंबली, कर्णधार आफ्रिदी रागाने लालबुंद झाला, म्हणतो, 'आम्ही बघून घेऊ...'
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आजच्या सामन्यात बांग्लादेशला हरवल्यास भारत फायनलमध्ये पोहोचणार आहे. पण भारत फायनलमध्ये पोहोचण्याआधी पाकिस्तानला मिरची झोंबली आहे.
advertisement
1/7

आशिया कपमध्ये आज भारत आणि बांग्लादेश हे दोन संघ भिडणार आहेत. या सामन्याला आता काही तासात सूरूवात होईल. या सामन्यातून विजयी होणारा संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे.
advertisement
2/7
आजच्या सामन्यात बांग्लादेशला हरवल्यास भारत फायनलमध्ये पोहोचणार आहे. पण भारत फायनलमध्ये पोहोचण्याआधी पाकिस्तानला मिरची झोंबली आहे. ही गोष्ट समजताच पाकिस्तानी गोलंदाज शाहिन आफ्रिदी रागाने लालबुंद झाला आहे.
advertisement
3/7
पाकिस्तानचा पुढचा सामना बांग्लादेशविरूद्ध आहे. हा सामना 25 सप्टेंबरला रंगणार आहे. या सामन्यापुर्वी पाकिस्तानी गोलंदाज शाहिन आफ्रिदीची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत आफ्रिदी भारतावर खूप उघडला आहे.
advertisement
4/7
त्याचं झालं असं की सुर्यकुमार यादवने भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीच रायव्हलरी उरली नसल्याचे स्पष्ट केले होते. सुर्याच्या याच विधानाचा धागा धरून आज पत्रकाराने सवाल केला होता.
advertisement
5/7
या प्रश्नावर बोलताना पाकिस्तानी कर्णधार शाहीन आफ्रिदीने सुरूवातीला हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर तो म्हणाला, ते त्यांचे विचार आहेत,त्यामुळे त्यांना बोलू द्या, असे त्याने म्हटले.
advertisement
6/7
त्यानंतर भारताविरूद्ध दोन सामने हारल्यानंतर शाहिदी आफ्रिदी म्हणाला, जेव्हा आम्ही (फायनलमध्ये रविवारी) भेटू तेव्हा आम्ही बघू, काय नाही आहे. इथे आम्ही आशिया कप जिंकायला आलो आहे,त्यामुळे आम्ही मेहनत घेतोय,असे देखील तिने सांगितले.
advertisement
7/7
एकंदरीत आफ्रीदीचं म्हणणं होतं की ना भारत फायनलमध्ये पोहोचला आहे ना आम्ही. पण फायनलमध्ये सामना झाला तर बघून घेऊ.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Asia Cup 2025 : टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचण्याआधी पाकिस्तानला मिरची झोंबली, कर्णधार आफ्रिदी रागाने लालबुंद झाला, म्हणतो, 'आम्ही बघून घेऊ...'