'हा खूप कठोर निर्णय, पण घ्यावा लागला', प्लेइंग इलेव्हनवर सूर्या असं का म्हणाला? आफ्रिकेने टॉस जिंकला
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया सुपर-8 चा त्यांचा पहिला सामना खेळत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होत आहे.
advertisement
1/8

भारत आणि दक्षिण आफ्रिका ग्रुप स्टेजमधल्या त्यांच्या सर्व 4 मॅच जिंकून सुपर-8 मध्ये आले आहेत. टीम इंडियाने युएसए, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा पराभव केला. तर दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड, अफगाणिस्तान, कॅनडा आणि युएईला धूळ चारली.
advertisement
2/8
ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेसमोर फार आव्हान उभं राहिलं नाही, पण आता दोन्ही टीमसाठी यंदाच्या वर्ल्ड कपमधला हा सगळ्यात कठीण सामना असू शकतो, कारण या दोन्ही टीम वर्ल्ड कप विजयाच्या प्रबळ दावेदार आहेत.
advertisement
3/8
सुपर-8 स्टेजमध्ये जी टीम 3 पैकी 3 सामने जिंकेल तिचा सेमी फायनलमध्ये प्रवेश निश्चित होईल, पण एक सामना जरी गमावला तरी त्या टीमला सेमी फायनलला पोहोचण्यासाठी इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल.
advertisement
4/8
या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. पहिले बॅटिंग करून मोठा स्कोअर करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं एडन मार्करम म्हणाला आहे.
advertisement
5/8
आम्हालाही पहिले बॅटिंग करायची होती, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली आहे. अक्षर पटेलबाबत आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागला आहे, पण आमच्याकडे काही पर्याय नव्हता, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
advertisement
6/8
टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये अभिषेक शर्मा 3 मॅच खेळला. या तिन्ही मॅचमध्ये तो शून्य रनवर आऊट झाला, त्यामुळे सुपर-8 मध्ये अभिषेकऐवजी संजूला संधी मिळेल, असं बोललं जात होतं. पण कर्णधार सूर्याने अभिषेकवर पुन्हा एकदा विश्वास ठेवला आहे.
advertisement
7/8
भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
advertisement
8/8
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन : एडन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
'हा खूप कठोर निर्णय, पण घ्यावा लागला', प्लेइंग इलेव्हनवर सूर्या असं का म्हणाला? आफ्रिकेने टॉस जिंकला