TRENDING:

Tips And Tricks : कपड्यांच्या घड्या घालणं कंटाळवाणं वाटतं? 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, चुटकीसरशी होईल तुमचं काम!

Last Updated:
How to fold cloths easily and quickly : बरेच लोक हल्ली आठवड्याचे कपडे एकदाच धुतात आणि मग ते एकदाच घड्या घालून कपाटात ठेवावेही लागतात. अशावेळी खूप कपडे असतात आणि आपल्याला ते काम करावंसं वाटतं. नाही. तुमच्या या समस्येवर आम्ही काही सोपे उपाय, घेऊन आलो आहोत. चला पाहूया तुमचं काम सोपं करणाऱ्या काही ट्रिक्स.
advertisement
1/7
कपड्यांच्या घड्या घालणं कंटाळवाणं वाटतं? 'या' ट्रिक्स वापरा, चुटकीसरशी होईल काम!
कपडे धुतले जातात, वाळवले जातात. मात्र त्यानंतर त्या कपड्यांच्या घड्या घालणं हे खूप कंटाळवाणं काम काही लोकांसाठी असू शकतं. तुमचं हेच कंटाळवाणं काम सोपं आणि आणि काहीसं रंजक बनवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
advertisement
2/7
काही कपड्यांच्या घड्या घालण्याऐवजी तुम्ही ते कपडे थेट हँगर्सवर लटकवू शकता. शक्यता तितके कपडे हँगर्सवर लटकवा, म्हणजे तुम्हाला कमी कपड्यांच्या घड्या घालाव्या लागतील. हल्ली हँगर्सचे वेगवेगळे पर्यायही मिळतात, जे कमी जागेत जास्त कपडे लटकावण्यासाठी बनवलेले असतात. तुम्ही त्यांचा वापर करू शकता.
advertisement
3/7
प्रत्येक कपड्याला फ्लोड करण्यापेक्षा काही कपडे सरळ रोल करा आणि कपाटाच्या ड्रॉवर्समध्ये ठेवा. जाड कपड्यांसोबत तुम्ही हे करू शकता. यामुळे तुम्हाला कपडे लवकर सापडातीलही आणि ते घड्या घालण्याचा वेळी वाचेल.
advertisement
4/7
हल्ली आपल्याकडे बेडशिटचे सेट असतात, म्हणजेच त्यांच्या उशीचे कव्हरदेखी सारखेच असते. असे बेडशीट कपाटात ठेवताना ते उशीच्या कव्हरमध्ये ठेवल्यास, तुम्हाला जेव्हा ते लागेल तेव्हा काढताना सर्व एकाच जागी मिळेल. त्यामुळे बेडशीट कुठे कव्हर कुठे हे शोधण्याची गरज पडणार नाही.
advertisement
5/7
कपडे फोल्ड करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे फोल्डिंग बोर्ड वापरणे. बाजारात असे अनेक फोल्डिंग बोर्ड मिळतात. त्यांचा वापर करून तुम्ही कमी वेळेत कपड्यांच्या घड्या सहज घालू शकता. ती शर्टच्या घड्या घालण्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे.
advertisement
6/7
हल्ली अनेक शहरांमध्ये जसे कपडे धुवून मिळतात तसेच ते घड्या करण्यासाठी सेवा मिळतात. तुम्ही खूपच व्यस्त असाल किंवा अगदीच जास्त कपडे असतील अन तुम्हाला कमी वेळेत काम करायचं असेल तर तुम्ही त्या सेवांचा लाभ घेऊ शकता.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : कपड्यांच्या घड्या घालणं कंटाळवाणं वाटतं? 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, चुटकीसरशी होईल तुमचं काम!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल