TRENDING:

Samudrik Shastra: योग्य वेळी योग्य गोष्टी मिळत राहतात; अंगावर अशा ठिकाणी तीळ म्हणजे नशिबाची प्रचंड साथ

Last Updated:
Samudrik Shastra: मनुष्याच्या शरीरावर कुठेही तीळ असू शकतो. लहानपणापासून आपण ऐकलेले असते की अमूक ठिकाणी तीळ असेल तर नशीबवान माणूस असतो. सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीराची ठेवण, हातावरील रेषा आणि तीळ यांच्या आधारे व्यक्तीच्या जीवनाबद्दल काही गोष्टी सांगितल्या जातात. शरीराच्या काही विशिष्ट भागांवर असलेले तीळ हे अत्यंत शुभ मानले जाते. अशाच काही शुभ तिळांविषयीची माहिती खालीलप्रमाणे आहे..
advertisement
1/5
योग्य वेळी योग्य गोष्टी मिळतात; अंगावर अशा ठिकाणी तीळ म्हणजे नशिबाची प्रचंड साथ
तळहाताच्या मध्यभागी तीळ - सामुद्रिक शास्त्रानुसार, जर हाताच्या तळव्याच्या मध्यभागी तीळ असेल, तर त्या व्यक्तीला नशिबाची पूर्ण साथ मिळते. असे लोक आपल्या कष्टाने आयुष्यात प्रचंड यश मिळवतात. विशेषतः, जर मुठ वळल्यानंतर तो तीळ मुठीच्या आत लपला जात असेल, तर ते अधिक शुभ मानले जाते. अशा व्यक्तीला आयुष्यभर सुख आणि समृद्धी प्राप्त होते.
advertisement
2/5
गालावर तीळ - एखाद्या व्यक्तीच्या उजव्या गालावर तीळ असणे हे सौभाग्याचे लक्षण आहे. असे लोक मेहनती असण्यासोबतच खूप उत्साही असतात. त्यांना कमी कष्टांतही मोठे यश मिळू शकते. वयाच्या 30 वर्षांनंतर हे लोक जीवनातील सर्व सुखांचा उपभोग घेऊ शकतात.
advertisement
3/5
कमरेवर तीळ असणे - पुरुषांच्या कमरेच्या उजव्या बाजूला आणि स्त्रियांच्या कमरेच्या डाव्या बाजूला तीळ असणे हे सौभाग्याचे सूचक आहे. असे लोक समाजात मोठी प्रतिष्ठा मिळवतात. त्यांचे ध्येय स्पष्ट असते आणि आत्मविश्वास दांडगा असतो. नशीब आणि मेहनतीमुळे त्यांना मोठी पदे किंवा यश मिळू शकते. अशा लोकांकडे पैशांची कमतरता भासण्याची शक्यता खूप कमी असते.
advertisement
4/5
कपाळावर तीळ असणे - तुमच्या कपाळाच्या बरोबर मध्यभागी तीळ असेल, तर तुम्ही खूप भाग्यवान आहात असे समजावे. अशा लोकांना वयाच्या 35 वर्षांनंतर मोठे यश मिळते. त्यांना आयुष्यातील सर्व सुख-सुविधा सहज मिळतात. तसेच, आपल्या बौद्धिक कौशल्यामुळे हे लोक समाजात मान-सन्मान मिळवतात.
advertisement
5/5
नाकावर तीळ असणे - लोकांच्या नाकावर तीळ असतो, त्यांना नशिबाचे श्रीमंत मानले जाते. अशा व्यक्तींना आयुष्यात सर्व प्रकारचे सुख मिळते. त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. मात्र, अशा लोकांचा स्वभाव थोडा रागीट असू शकतो, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नकारात्मक पैलू मानला जातो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Samudrik Shastra: योग्य वेळी योग्य गोष्टी मिळत राहतात; अंगावर अशा ठिकाणी तीळ म्हणजे नशिबाची प्रचंड साथ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल