Bigg Boss Marathi 6 : आता रितेश देशमुखही वैतागला; म्हणाला, 'बोअर करताय, कृपया शो...'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठी 6 मधील सदस्यांचा गेम पाहून आता रितेश देशमुखही वैतागला आहे. त्याने तुम्ही बोअर करताय असं म्हटलं आहे.
advertisement
1/5

बिग बॉस मराठीचा सहावा सीझन म्हणावा तसा प्रेक्षकांना आवडलेला नाही आहे. सुरुवातीपासूनच या सीझनवर बिग बॉस प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. बिग बॉसचा हा सीझन पाहायला मजा येत नाही असं सांगितलं आहे. आता तर रितेश देशमुखही या सीझनच्या स्पर्धकांना वैतागलेला दिसला आहे. तुम्ही बोअर करताय, कृपया शो... अशी विनंती त्याने भाऊच्या धक्क्यावर केली आहे.
advertisement
2/5
बिग बॉस मराठी 6 चा भाऊच्या धक्क्याचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात रितेश देशमुख शो बोअरिंग झाल्याचं म्हणताना दिसतो. रितेश राखीवरून सचिन कुमावला सुनावत असतो, त्यावेळी तो रागात हे बोलून टाकतोय
advertisement
3/5
सचिनने राखीवर पाणी आणि पीठ फेकलं हे रितेशला आवडलं नाही. त्यावरून त्याने सचिनला झापलं. यावर सचिनने ती नॅच्युरल रिअॅक्शन असल्याचं म्हटलं.
advertisement
4/5
यावर रितेश म्हणाला "मला तर वाटलं होतं हा गेम प्लॅन आहे. पण आता तुम्ही म्हणताय हा गेम प्लॅनच नाहीये. जर तुम्ही प्लॅन न करता हे पाणी एका महिलेच्या चेहऱ्यावर फेकताय तर काय तुमची रिस्पेक्ट राहणार आहे. खरं हे मला खूप खटकलं आहे, असं तो म्हणाला.
advertisement
5/5
तुमच्या लोकांमध्ये क्लिअरिटी नाही की तुम्ही काय प्लॅन करताय आणि काय नाही. म्हणजे अक्षरश: सांगू का तुम्ही बोअर करताय. हा बिग बॉस शो आहे, हा स्क्रिप्टेड शो नाही. या शोला कृपया स्क्रिप्टेड शो बनवू नका, असं त्याने सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : आता रितेश देशमुखही वैतागला; म्हणाला, 'बोअर करताय, कृपया शो...'