TRENDING:

Skin Care Tips : तुमची त्वचा खोलवर डॅमेज करतात 'या' 5 वस्तू! स्वतः डॉक्टरांनीच दिला गंभीर धोक्याचा इशारा

Last Updated:
these 5 things can damage skin and hair : आपल्या त्वचेबद्दल सर्वजण खूप जागरूक असतात. सर्वतोपरी आपण आपल्या त्वचेची काळजी घेत असतो. मात्र आपल्या नकळत काही अशा गोष्टी आहेत, ज्या आपल्याला त्वचेसाठी खूप चांगल्या वाटतात. मात्र खरं तर त्या आपल्या त्वचेचे नुकसान करत असतात. म्हणूनच या वस्तू वापरणं आपण बंद केलं पाहिजे. चला पाहूया त्या वस्तू कोणत्या आहेत.
advertisement
1/9
तुमची त्वचा खोलवर डॅमेज करतात या 5 वस्तू! स्वतः डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
त्वचेच्या देखभालीसाठी किंवा आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये आपण काही अशा वस्तू वापरतो, ज्या आपल्या त्वचेसाठी खरं तर घातक असतात. याची माहिती खुद्द डॉक्टरांनी दिली आहे. बंगळुरू येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलमधील वरिष्ठ त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शिरीन फुर्तादो यांनी 'द इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
2/9
डॉक्टरांच्या मते, काही सौंदर्य उत्पादने आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी हानिकारक मानले जातात. आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या सौंदर्यासाठी आपण कोणती उत्पादने का टाळावीत आणि कोणते चांगले पर्याय आहेत. हेदेखील त्यांनी सांगितले.
advertisement
3/9
सर्वात आधी आपण बोलूयात मेकअप वाइप्सबद्दल. तुम्हाला वाटेल कअप वाइप्स तर आपली त्वचा स्वच्छ करतात, मग ते आपल्यासाठी घातक कसे असतील. पण ते असतात. कारण त्यात अल्कोहोल आणि सुगंध असतो, जो त्वचेला कोरडे बनवू शकतो आणि त्यामुळे इरिटेशनदेखील होते. त्याऐवजी डॉक्टरांनी डबल क्लींजिंग किंवा मायसेलर वॉटर वापराने सुरक्षित असल्याचे मानतात.
advertisement
4/9
त्यानंतर असतो लूफा. तुम्ही लूफाविषयी काहीवेळा ऐकले असेल. तज्ञांच्यामते, लूफा आपली त्वचा एक्सफोलिएट करत असला, तरी त्यात बॅक्टेरिया आणि मृत त्वचेच्या पेशी जमा होतात आणि त्या लवकर ओघात नाही. आपण लूफा उन्हातदेखील ठेवत नाही, तो बाथरूमध्येच आर्द्र ठिकाणीच राहतो, ज्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते.
advertisement
5/9
बॅक्टेरिया असलेला लूफा वापरल्यास आपल्या त्वचेवर मुरुमे आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो. लूफा तुमच्या त्वचेच्या वरच्या थराला देखील नुकसान करू शकतो. त्याऐवजी तुम्ही मऊ टॉवेल, वॉशक्लोथ किंवा सौम्य रासायनिक एक्सफोलिएटर वापरू शकता.
advertisement
6/9
नोज स्ट्रीप्सदेखील त्वचा स्वच्छ करण्याचे काम करतात. नोज स्ट्रिप्स ब्लॅकहेड्स काढून टाकतात, परंतु त्वचेतील नैसर्गिक तेले देखील शोषून घेतात.म्हणूनच नोज स्ट्रिप्स वापरणं आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतं. त्याऐवजी तुम्ही सॅलिसिलिक अॅसिड किंवा क्ले मास्कने फेस वॉश करणे चांगले.
advertisement
7/9
त्वचेनंतर आपण केसांबद्दल बोलूया. केस विंचरण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिकचा कंगवा तुमच्यासाठी चुकीचा ठरू शकतो. प्लास्टिकचा कंगवा तुमच्या केसांमध्ये स्थिर घर्षण निर्माण करतो, ज्यामुळे केस कोरडे आणि ठिसूळ होतात, कधीकधी तुटतातही. प्लॅस्टिकच्या कंगव्याची शार्प टोकं टाळूला हानी पोहोचवू शकतात. म्हणूनच डॉक्टरांनी वूडन किंवा कार्बनपासून बनवलेला रुंद दातांचा कंगवा वापरण्याचा सल्ला देतात.
advertisement
8/9
त्याचबरोबर काही शॅम्पू केस गळती रोखण्याचा दावा करतात, तेदेखील आपल्या केसांसाठी घातक ठरू शकतात. या शॅम्पूमध्ये खूप कठोर रसायने असतात, जे आपल्या केसांचे नुकसान करू शकतात. म्हणूनच डॉक्टरांनी सौम्य आणि सल्फेट-मुक्त शॅम्पू वापरण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Skin Care Tips : तुमची त्वचा खोलवर डॅमेज करतात 'या' 5 वस्तू! स्वतः डॉक्टरांनीच दिला गंभीर धोक्याचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल