TRENDING:

SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार

Last Updated:
इंग्लंडने दिलेल्या 146 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव हा 95 धावांवर ऑल आऊट झाला होता.त्यामुळे इंग्लंडने हा सामना 51 धावांनी जिंकला होता.
advertisement
1/7
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
सूपर 8 मध्ये आज यजमान श्रीलंकेचा इंग्लंडने 51 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडच्या या विजयाने आता त्यांनी सेमी फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.
advertisement
2/7
इंग्लंडने दिलेल्या 146 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव हा 95 धावांवर ऑल आऊट झाला होता.त्यामुळे इंग्लंडने हा सामना 51 धावांनी जिंकला होता.
advertisement
3/7
दरम्यान आता सुपर 8 च्या श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यातील निकालानंतर समीकरण पू्र्णपणे बदलेले आहे. त्यामुळे आता श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन टीम पैकी एक टीम स्पर्धेबाहेर होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
कारण सुपर 8 मध्ये प्रत्येक संघाने 2 सामने जिंकणे आवश्यक आहे. त्यात आता श्रीलंकाने सुपर 8 मधला पहिला सामना इंग्लंडविरूद्ध हारला आहे. आता 25 फेब्रुवारी 2026 चा न्युझीलंड विरुद्धचा सामना जर श्रीलंका पराभूत झाली, तर ती सरळ सरळ वर्ल्ड कपमधून बाहेर होणार आहे.
advertisement
5/7
पाकिस्तान बद्दल बोलायचं झालं तर त्यांचा सूपर 8 मधला न्यूझीलंड विरूद्धचा पहिलाच सामना हा पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे दोन्ही संघाना एक एक गुण देण्यात आला आहे.
advertisement
6/7
आता पाकिस्तानचा दुसरा सामना हा इंग्लंड विरूद्ध 24 फेब्रुवारी 2026 ला आहे. जर या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला तर तो देखील स्पर्धेतून बाहेर होणार आहे.
advertisement
7/7
तसेच इंग्लंडच्या सुपर 8 मधल्या पहिल्याच विजयाने आता ते सेमी फायनलच्या जवळ गेले आहे. आता इंग्लंडचा पुढचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरूद्ध आहे. या दोन सामन्यांपैकी जर इंग्लंडने एकही सामना जिंकला तर ते सेमी फायनलला पोहोचणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल