T20 World Cup : अभिषेकचा फॉर्म नाही, तर टीम इंडियाला QRT चा धोका, कॅप्टन सूर्या कसं भेदणार चक्रव्यूह?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 स्टेजला सुरूवात झाली आहे. सुपर-8 मधला टीम इंडियाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा हा सगळ्यात कठीण सामना ठरू शकतो.
advertisement
1/6

दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधल्या त्यांच्या ग्रुप स्टेजच्या सर्व 4 मॅच जिंकून सुपर-8 मध्ये क्वालिफाय झाल्या आहेत. तसंच दोन्ही टीम यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्याच्या प्रबळ दावेदारही आहेत. मागच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये या दोन टीममध्येच फायनल झाली होती.
advertisement
2/6
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याचा बराच अनुभव आहे, त्यामुळे भारतातल्या खेळपट्टीबद्दल त्यांना चांगली माहिती आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये बरेच मॅच विनर आहेत, जे एकहाती मॅचचा निकाल बदलू शकतात. आफ्रिकेच्या टीममध्ये असलेल्या QRT पासून भारताला सर्वाधिक धोका असणार आहे.
advertisement
3/6
क्विंटन डिकॉक टी-20 क्रिकेटमधल्या दिग्गज खेळाडूपैकी एक आहे. मागच्या बऱ्याच वर्षांपासून डिकॉक आयपीएल खेळत आहे, त्यामुळे त्याला भारतीय खेळपट्टीबद्दल अचूक माहिती आहे. फक्त फास्ट बॉलरच नाही तर स्पिनरवरही डिकॉक आक्रमण करू शकतो.
advertisement
4/6
दक्षिण आफ्रिकेकडे रेयान रिकलटनचा पर्याय आहे, जो टी-20 क्रिकेटमध्येही तंत्रशुद्ध बॅटिंग करतो. दक्षिण आफ्रिकेची टी-20 लीग असलेल्या एसए20 मध्ये रिकलटनने धमाकेदार कामगिरी केली आहे. गरज पडली तर रिकलटन गियर बदलून मोठ्या सिक्सही मारू शकतो.
advertisement
5/6
जगातला सगळ्यात धोकादायक फिनिशर म्हणून ट्रिस्टन स्टब्सकडे पाहिलं जातं. स्टब्स मैदानाच्या चारही बाजूंना मोठे शॉट मारू शकतो. स्पिनरविरुद्धचं त्याचं फुटवर्क आणि डेथ ओव्हरमधली पॉवर हिटिंग त्याला आणखी धोकादायक बनवते.
advertisement
6/6
क्विंटन डिकॉक, रियान रिकलटन आणि ट्रिस्टन स्टब्स या तीन QRT च्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचं आव्हान टीम इंडियापुढे असणार आहे. या तिघांना रोखण्यात टीम इंडियाला अपयश आलं तर त्याची मोठी किंमत टीम इंडियाला मोजावी लागू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : अभिषेकचा फॉर्म नाही, तर टीम इंडियाला QRT चा धोका, कॅप्टन सूर्या कसं भेदणार चक्रव्यूह?