Team India : प्रॅक्टिस झाली, पण तेच 'प्रॉब्लेम' कायम, वर्ल्ड कप सुरू होताच सूर्यासमोर आली 5 चॅलेंज!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्ड कपच्या मोहिमेला प्रॅक्टिस मॅचपासून सुरूवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियाचा 30 रननी विजय झाला आहे, पण वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची डोकेदुखी 5 गोष्टींनी वाढली आहे.
advertisement
1/5

वर्ल्ड कपआधीची प्रॅक्टिस मॅच ही प्रत्येक खेळाडूला सराव मिळावा म्हणून खेळवली जात होती. पण टीम इंडियाने फॉर्ममध्ये नसलेल्या संजूला प्रॅक्टिस मॅचमध्ये खेळवलंच नाही. वर्ल्ड कपआधी संजूला फॉर्ममध्ये आणायची ही शेवटची संधी होती, पण भारतीय टीम मॅनेजमेंटने त्याला बेंचवरच बसवलं.
advertisement
2/5
टी-20 क्रिकेटमध्ये मागच्या काही काळापासून टीम इंडियाची बॅटिंग धमाका करत आहे, त्यामुळे टीम अगदी सहज 200 रनचा टप्पा गाठते, पण भारतीय बॉलर्सही 200 रन देत आहेत. न्यूझीलंडविरुद्धची सीरिज आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यातही भारतीय बॉलरही 200 रन खात असल्याचं दिसून आलं आहे.
advertisement
3/5
हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे टीम इंडियाचे टी-20 मधले प्रमुख ऑलराऊंडर आहेत, पण सराव सामन्यात दोघांनीह बऱ्याच रन दिल्या. हार्दिकने 2 ओव्हरमध्ये 28 तर शिवम दुबेने 4 ओव्हरमध्ये तब्बल 57 रन खर्च केल्या.
advertisement
4/5
जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाचा हुकमी एक्का आहे. सराव सामन्यात बुमराहला विश्रांती दिली गेली. याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या एका सामन्यातही बुमराह खेळला नव्हता. चौथ्या सामन्यात बुमराहने 4 ओव्हरमध्ये 38 रन आणि पाचव्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये एकही विकेट न घेता 58 रन दिले. लागोपाठ 2 सामन्यांमधलं हे अपयश टीमची चिंता वाढवू शकतं.
advertisement
5/5
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हर्षित राणाने 1 ओव्हरमध्ये 16 रन दिल्या. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्येही हर्षित राणाने विकेट घेतल्या होत्या, पण त्याच्यावर बॅटिंग टीमने आक्रमणही केलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : प्रॅक्टिस झाली, पण तेच 'प्रॉब्लेम' कायम, वर्ल्ड कप सुरू होताच सूर्यासमोर आली 5 चॅलेंज!