RCB दुसऱ्यांदा चॅम्पियन झाल्यावर विराटचा आनंद गगनात मावेना, स्मृती अँड कंपनीसाठी केली धमाकेदार पोस्ट, 'पोरींनो तुम्ही नक्कीच...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Virat Kohli Heartfelt Wish For RCB Women : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या महिला टीमने ऐतिहासिक कामगिरी करत पुन्हा एकदा WPL च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.
advertisement
1/7

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळताना आरसीबीने कोटंबी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून दुसऱ्यांदा विमेन्स प्रीमियर लीगचे (WPL) जेतेपद पटकावलं आहे. त्यानंतर किंग कोहली भलताच खूश झालेला दिसतोय.
advertisement
2/7
या दिमाखदार विजयानंतर भारताचा दिग्गज फलंदाज आणि आरसीबीचा स्टार विराट कोहली याने महिला टीमचे भरभरून कौतुक केलं असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
3/7
आरसीबी एकदा पुन्हा चॅम्पियन! आरसीबीचा झेंडा उंचावत ठेवल्याबद्दल तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो, असं विराट कोहलीने इन्टाग्राम पोस्ट करत म्हटलं आहे.
advertisement
4/7
स्मृती आणि संपूर्ण संघ तसेच व्यवस्थापन संघाला या विजयाबद्दल खूप खूप अभिनंदन. तुम्ही या विजयासाठी निःसंशयपणे पात्र आहात, असंही किंग कोहली म्हणाला.
advertisement
5/7
ट्रॉफी जिंकली आता या क्षणाचा आनंद घ्या आणि आमच्या अप्रतिम चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार करा, असं म्हणत विराट कोहलीने आरसीबीसाठी पोस्ट केली आहे.
advertisement
6/7
विराट कोहली अनेकदा वुमेन्स खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसतो. दुसऱ्यांदा WPL जिंकून त्यांनी आपला दबदबा सिद्ध केला असून आरसीबी फॅन्समध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
advertisement
7/7
दरम्यान, आरसीबीसाठी जॉर्जियाने 54 बॉलमध्ये 79 रन्स बनवत आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि चाहत्यांना सेलिब्रेशनची मोठी संधी दिली. तर राधा यादवचा फिनिशिंग टच कामी आला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
RCB दुसऱ्यांदा चॅम्पियन झाल्यावर विराटचा आनंद गगनात मावेना, स्मृती अँड कंपनीसाठी केली धमाकेदार पोस्ट, 'पोरींनो तुम्ही नक्कीच...'