ZIM vs AUS : 'सिकंदर' राजा घायाळ झाला, पण प्रजेने सामना जिंकून दिला, ऑस्ट्रेलियासारख्या चॅम्पियन टीमला धूळ चारली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सिंकदर रझा दुखापतग्रस्त झाल्यानंतर झिम्बाबे सामना जिंकेल की नाही अशी साशंकता होती. पण सिकंदर रझाची प्रजा लढवय्या निघाली आणि त्यांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवून दाखवलं.
advertisement
1/8

आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये आज झिम्बाबेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा अवघ्या 23 धावांनी पराभव केला आहे. तसेच हा सामना जिंकून त्यांनी वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर केला आहे.
advertisement
2/8
झिम्बाबेने ऑस्ट्रेलियासमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 146 धावांवर ऑल आऊट झाला होता.त्यामुळे झिम्बाबेने हा सामना 23 धावांनी जिंकला होता.
advertisement
3/8
टी20 वर्ल्ड कपमधला हा दुसरा सर्वात मोठा उलटफेर आहे.त्यामुळे या विजयाची चर्चा सर्वंत्र रंगली आहे. पण हा विजय मिळवणे झिम्बाबेसाठी तितकसं सोप्प नव्हतं.कारण त्यांचा महत्वाचा खेळाडू आणि कॅप्टन सिकंदर रझा हा दुखापतग्रस्त झाला होता.
advertisement
4/8
कर्णधार सिंकदर रझा हा मैदानात गोलंदाजी करताना त्याच्या पायात गोळा आला होता.त्यामुळे तो मैदानात झोपून गेला होता.त्यानंतर त्याला चालण्यास अडचण होत असल्याने त्याने मैदान सोडलं होतं.
advertisement
5/8
खरं तर सिंकदर रझा दुखापतग्रस्त झाल्यानंतर झिम्बाबे सामना जिंकेल की नाही अशी साशंकता होती. पण सिकंदर रझाची प्रजा लढवय्या निघाली आणि त्यांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवून दाखवलं.
advertisement
6/8
झिम्बाबेने ऑस्ट्रेलियाला दिलेल्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 31 आणि मॅट रेन्शॉने 65 धावांची खेळी केली होती. पण या दोघांची विकेट पडताच सामना फिरला होता.
advertisement
7/8
झिम्बाबेकडून यावेळी ब्लेसिंग मुजरबानीने सर्वाधिक 4 विकेट तर ब्रॅड इ्वानने 3 विकेट, रायन बुरल आणि वेलिंग्टन मसाकडझाने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
advertisement
8/8
झिम्बाबेच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर ब्रायन बेनेटने सर्वाधित 64 धावांची नाबाद खेळी केली होती.रायन बुरल आणि तादीवानाशे मुरूमानीन या दोघांनी प्रत्येकी 35 धावांची खेळी केली होती.आणि सिकंदर राजा 25 धावांवर नाबाद राहिला होता. या बळावर झिम्बाबेने 2 विकेट गमावून 169 धावा केल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
ZIM vs AUS : 'सिकंदर' राजा घायाळ झाला, पण प्रजेने सामना जिंकून दिला, ऑस्ट्रेलियासारख्या चॅम्पियन टीमला धूळ चारली