TRENDING:

Success story: टीम नाही, ऑफिस नाही; तरीही दिवसाची कमाई २८ कोटी! कोण आहे हा तरुण?

Last Updated:
Success story: AI चा चमत्कार! घरातून एका लॅपटॉपवर उभं केलं १६,७०० कोटींचं साम्राज्य; कोण आहे हा तरुण? का होतेय त्याची चर्चा, कर्मचाऱ्यांशिवाय तो कसं कमावतो इतका पैसा?
advertisement
1/6
Success story: टीम नाही, ऑफिस नाही; तरीही दिवसाची कमाई २८ कोटी! कोण आहे हा तरुण?
दोन लोकांच्या जीवावर अख्खी कंपनी उभी करून ती चालवून त्यातून कोट्यवधींचा नफाही कमावते, पण कसं? हा तुम्हाला ही प्रश्न पडला असेल. पण होय असा एक व्यक्ती आहे जो सगळं एकट्याने करतोय तेही AI च्या मदतीनं. घरात एका लॅपटॉपच्या मदतीनं तो सगळी कामं AI ची मदत घेऊन करतो आणि त्याच्या कंपनीतून नफाही कमावतो आहे. भविष्यात एकटा माणूसही १ अब्ज डॉलरची कंपनी उभी करू शकेल," हे 'ओपन एआय'चे सीईओ सॅम ऑल्टमन यांचं विधान मॅथ्यू गॅलेगरने खरं करून दाखवलं आहे.
advertisement
2/6
मॅथ्यू यांनी मेडवी (Medvee) नावाचा एक टेलिहेल्थ प्लॅटफॉर्म सुरू केला असून, यावर्षी ही कंपनी तब्बल 15000 कोटी रुपयांचा टर्नओव्हर केला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण कंपनीत मॅथ्यूशिवाय त्याचा भाऊ हा एकमेव कर्मचारी आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये मॅथ्यू यांनी अवघ्या २०,००० डॉलर्सच्या गुंतवणुकीतून हा व्यवसाय सुरू केला. मेडवी प्लॅटफॉर्मद्वारे वजन कमी करणारी औषधे ऑनलाइन विकली जातात.
advertisement
3/6
पहिल्याच महिन्यात ३०० ग्राहक ऑनलाइन त्यांच्याशी जोडले. त्यानंतर हा आकडा हळूहळू वाढत गेला. दुसऱ्या महिन्यात ही संख्या १,३०० वर पोहोचली. २०२५ या पहिल्याच आर्थिक वर्षात कंपनीने ३,७०० कोटींची विक्री केली असून त्यावर ६०० कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला. यासाठी मॅथ्यू यांचे कष्ट आणि मेहनतही अफाट आहे हे मान्य करावंच लागेल. एकावेळी 12 पेक्षा जास्त टूल्सचा वापर करून त्यांनी हे कामं शक्य करून दाखवलं.
advertisement
4/6
१२ पेक्षा जास्त AI टूल्स हा बिजनेस चालवण्यासाठी मदत करतात. ही कंपनी उभी करण्यासाठी डझनभर एआय टूल्सची मदत घेतली. चॅटजीपीटी, क्लॉड आणि ग्रोक, मिडजर्नी आणि रनवे वापरून फोटो आणि व्हिडिओ तयार केले. इलेवनलॅब्स'द्वारे एआय व्हॉइस सिस्टीम आणि स्वतःच्या आवाजाचे क्लोन बनवले. डॉक्टरांचे नेटवर्क आणि औषध डिलिव्हरीसाठी केअरव्हॅलिडेटसारख्या प्लॅटफॉर्मची मदत घेतली.
advertisement
5/6
यापूर्वी मॅथ्यू यांनी ६० कर्मचाऱ्यांची वॉच गँग नावाची कंपनी चालवत होता, पण ती तोट्यात गेली. त्यातून तो एक गोष्ट शिकला. जास्त कर्मचारी म्हणजे जास्त खर्च आणि निर्णयांना होणारा उशीर. त्यामुळेच मेडवीमध्ये त्याने फक्त आपल्या भावालाकामावर ठेवलं आहे, जो केवळ महत्त्वाचे कॉल्स आणि मेसेज फिल्टर करण्याचं काम करतो.
advertisement
6/6
मॅथ्यू यांचं बालपण अत्यंत हालाकीच्या परिस्थित गेलं आहे. त्याला या परिस्थितीची जाणीव असल्याने त्याने आपल्या नफ्यातील काही हिस्सा हा ज्यांना घर नाही अशा लोकांसाठी खर्च करत आहे. अशा संस्थांना मदत म्हणून देतोय. "वेगाने घेतलेले अचूक निर्णय हीच मेडवीची खरी ताकद आहे," असं मॅथ्यू यांनी अभिमानाने सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Success Story/
Success story: टीम नाही, ऑफिस नाही; तरीही दिवसाची कमाई २८ कोटी! कोण आहे हा तरुण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल