TRENDING:

बँकिंग फ्रॉडचं नो टेन्शन! Airtel ने आणलं AI ‘फ्रॉड अलर्ट’ सिस्टम

Last Updated:
Airtel ने AI पॉवर्ड फ्रॉड अलर्ट सिस्टम लॉन्च केली आहे. जी ओटीपीशी संबंधित बँकिंग फ्रॉडने यूझर्सला वाचवण्यात मदत करेल. ही सिस्टम कॉल दरम्यान संशयित ओटीपी शेयरिंगवर लगेच अलर्ट करेल. ज्यामुळे धोकेबाजीपासून बचाव करता येईल.
advertisement
1/5
बँकिंग फ्रॉडचं नो टेन्शन! Airtel ने आणलं AI ‘फ्रॉड अलर्ट’ सिस्टम
स्पेमशी संबंधित प्रकरणं वेगाने वाढत आहेत. हे पाहता टेलीकॉम कंपनी Airtel ने नवीन एआय-पॉवर्ड फ्रॉड अलर्ट सिस्टम यूझर्ससाठी लॉन्च केली आहे.
advertisement
2/5
ही नवीन सिस्टम ओटीपीशी संबंधित बँकिंग फ्रॉडपासून तुमचा बचाव करण्यात मदत करेल. नेहमीच दिसतं की, डिलिव्हरीच्या बहाण्याने किंवा कस्टमर सपोर्टचा बहाणा करुन किंवा मग कस्टमर सपोर्टचं नाव सांगून लोकांना फसवतात आणि त्यांच्याकडून ओटीपी घेतात.
advertisement
3/5
एअरटेलची प्रणाली अशा परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि ओळखण्यासाठी डिझाइन केलेली आहे, ज्यामुळे तात्काळ सूचना मिळतात. कॉल दरम्यान बँकेकडून ओटीपी आला तर सिस्टम यूझर्सना सतर्क करते की कॉलवर असताना ओटीपी शेअर करणे धोकादायक असू शकते.
advertisement
4/5
एअरटेलची ही प्रणाली फसवणुकीपासून संरक्षण करण्यास मदत करेल : एअरटेलने ही प्रणाली फसवणूक शोधण्यासाठी आणि ग्राहकांना फसवणूक होण्यापासून वाचवण्यासाठी डिझाइन केली आहे. गेल्या दोन वर्षांत, कंपनीने धोकादायक लिंक्स ब्लॉक करणे आणि यूझर्सना स्पॅम कॉलबद्दल लवकरात लवकर सतर्क करणे यासह अनेक एआय-संचालित सुरक्षा उपाय लागू केले आहेत. या महत्त्वपूर्ण पावलांमुळे नेटवर्कवरील फसवणूक लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
advertisement
5/5
नवीन फीचर अशाच धोक्यांपासून यूझर्सचा बचाव करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे. हे नवीन सिस्टम सध्या हरियाणामध्ये अॅक्टिव्ह आहे आणि एअरटेल लवकरच हे दोन आठवड्यात सर्व ग्राहकांसाठी बॅच बनवून उपलब्ध करण्याच्या दिशेने काम करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
बँकिंग फ्रॉडचं नो टेन्शन! Airtel ने आणलं AI ‘फ्रॉड अलर्ट’ सिस्टम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल