TRENDING:

Weather Alert: 48 तास धोक्याचे! महाराष्ट्रात पुन्हा वादळी संकट, 16 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7
Weather Alert: 48 तास धोक्याचे! महाराष्ट्रात पुन्हा वादळी संकट, 16 जिल्ह्यांना अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्राला अवकाळी संकटाने हैराण केल्याचं चित्र आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) च्या ताज्या अंदाजानुसार, 4 एप्रिलला महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30-50 किमी वेगाने वादळी वारे येण्याची शक्यता आहे. काही भागांत गारपिटीचा (Hailstorm) इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल.
advertisement
2/7
कोकणात किनारपट्टीच्या भागात अवकाळी पावसाचा जोर ओसरला आहे. आज हवामान कोरडे आणि काही ठिकाणी अंशत: ढगाळ राहील. मुंबईसह आसपासच्या भागांत देखील मुख्यत: कोरडे हवामानच असेल. कमाल तापमान 32-36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा किंवा उष्णतेचा अलर्ट नाही.
advertisement
3/7
मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धुमशान सुरू आहे. पुण्यासह, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस होतोय. आज देखील या भागात वादळी पावसाचा अंदाज आहे. मात्र कोणत्याही जिल्ह्याला महत्त्वाचा अलर्ट नाही. 24 तासानंतर हवामानात मोठ्या बदलांची शक्यता असून उष्णता वाढेल आणि पावसाचा जोर ओसरेल.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आज पुन्हा वादळी पाऊस होईल. विशेषत: अहिल्यानगर आणि जळगाव या जिल्ह्यांत ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट असेल. इतर जिल्ह्यांत तुरळक पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होईल.
advertisement
5/7
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांवर आज देखील अवकाळीचे काळे ढग घोंघावत आहे. छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड आणि धाराशिवमध्ये ताशी 30-50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह पाऊस आणि गारपीट होईल. पुढील 48 तास हवामानाची हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भात देखील अवकाळी संकट कायम आहे. आज ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच मेघगर्जना, विजा आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस होईल. अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट असेल. पुढे पावसाचा जोर काहीसा कमी होईल.
advertisement
7/7
दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज अवकाळी पावसाची शक्यता असून 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट असेल. बहुतेक भागांत कमाल तापमान 35-40 अंशांपर्यंत गेलं आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कमी होऊन उष्णतेची तीव्रता वाढेल. किनारी भागात दमट हवामानामुळे हैराण करणारी स्थिती असेल. विशेषत: शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: 48 तास धोक्याचे! महाराष्ट्रात पुन्हा वादळी संकट, 16 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल