TRENDING:

Holi 2025: फोनमध्ये पाणी किंवा रंग गेला तर काय करायचं?

Last Updated:
SIM कार्ड आणि बॅटरी काढा- फोन बंद केल्यानंतर त्यामधून SIM कार्ड, SD कार्ड आणि जर शक्य असेल तर बॅटरी काढून घ्या.
advertisement
1/6
Holi 2025: फोनमध्ये पाणी किंवा रंग गेला तर काय करायचं?
स्मार्टफोन वाचवण्यासाठी त्वरित पावले उचला- होळीचा सण रंगांचा असतो, पण याच रंगांमध्ये आपला स्मार्टफोन भिजल्यास मोठा फटका बसू शकतो. पाण्यात किंवा रंगांमध्ये पडल्यामुळे अनेकदा फोन खराब होतो. अशा वेळी घाबरून चुकीची पावले उचलण्याऐवजी योग्य उपाय केल्यास तुमचा फोन वाचू शकतो. जाणून घ्या काय करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात.
advertisement
2/6
पाणी लागल्यास फोन त्वरित बंद करा- जर तुमचा फोन पाण्यात पडला असेल किंवा रंगाने माखला असेल, तर सर्वप्रथम घाई न करता शांत राहा. फोन पटकन बाहेर काढा आणि तो लगेच बंद करा. चालू असताना पाण्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याचा धोका वाढतो, त्यामुळे फोन बंद करणे महत्त्वाचे आहे.
advertisement
3/6
SIM कार्ड आणि बॅटरी काढा- फोन बंद केल्यानंतर त्यामधून SIM कार्ड, SD कार्ड आणि जर शक्य असेल तर बॅटरी काढून घ्या. यामुळे फोनच्या आतील भागात अधिक पाणी जाण्याचा धोका कमी होतो. नंतर कोरड्या टिश्यू किंवा सॉफ्ट कपड्याने फोन स्वच्छ पुसून टाका.
advertisement
4/6
हे करू नका – गरम हवा आणि जास्त हलवणे टाळा- अनेक लोक पाणी सुटावे म्हणून फोन गरम करतात किंवा जोरात हलवतात. पण हे टाळा, कारण यामुळे पाणी फोनच्या आणखी आतील भागात जाऊ शकते आणि अधिक नुकसान होऊ शकते. सुकवण्यासाठी हॅअर ड्रायर किंवा मायक्रोवेवचा वापर अजिबात करू नका.
advertisement
5/6
फोन सुकवण्यासाठी योग्य पद्धत- फोन वाचवण्यासाठी सिलिका जेल सर्वोत्तम उपाय आहे. तुमच्याकडे सिलिका जेल नसेल, तर फोन तांदळात ठेवू शकता. फोन सुमारे ४८ तास असेच ठेवा. यामुळे फोन पूर्णपणे सुकण्यास मदत मिळेल. ४८ तासांनंतर फोन चालू करा. जर तो सुरू झाला नाही, तर अधिकृत सर्व्हिस सेंटरला दाखवा.
advertisement
6/6
होळीचा आनंद घ्या, पण तुमचा स्मार्टफोन सुरक्षित राहील याचीही काळजी घ्या. योग्य खबरदारी घेतल्यास आणि वरील उपाय केल्यास पाण्यात पडलेला फोन पुन्हा पूर्ववत होऊ शकतो. त्यामुळे रंगांचा सण साजरा करताना फोनची काळजी घ्या आणि गरज पडल्यास योग्य पद्धतीने उपाय करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Holi 2025: फोनमध्ये पाणी किंवा रंग गेला तर काय करायचं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल