Samsung Galaxy S25 Ultraवर बंपर डिस्काउंट! किंमतीत 18,599 रुपयांपर्यंत सूट, पहिल्यापेक्षा खूप स्वस्त
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Galaxy S25 Ultra 5G अॅमेझॉनवर 18,599 रुपयांची सूट आणि 1,500 बँक डिस्काउंटसह उपलब्ध आहे. यामध्ये 200MP कॅमेरा, Snapdragon 8 Elite, 12GB RAM आणि Galaxy AI फीचर्स मिळतात.
advertisement
1/7

सॅमसंग लवकरच Galaxy S26 Ultra लॉन्च करणार आहे. मात्र त्यापूर्वी कंपनीचा उपलब्ध फ्लॅगशिप Galaxy S25 Ultra 5G मोठ्या डिस्काउंटसह मिळत आहे. या प्रीमियम स्मार्टफोनवर जवळपास 18,599 रुपयांपर्यंत कपात पाहायला मिळत आहे. ज्यामुळे ही डील खुप आकर्षक बनली आहे.
advertisement
2/7
अॅमेझॉनवर सॅमसंग Galaxy S25 Ultra 5G ची किंमत सध्या 1,12,900 रुपये लिस्ट करण्यात आली आहे. जी याच्या लॉन्च प्राइजपेक्षा जवळपास 17,099 रुपये कमी आहे.याव्यतिरिक्त, निवडक बँक कार्डवर 1,500 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट उपलब्ध आहे. यामुळे फोनची प्रभावी किंमत सुमारे 1,10,000 रुपयांपर्यंत पोहोचते.तुम्हाला पूर्ण रक्कम आधीच भरायची नसेल, तर EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहेत. ग्राहक हा फोन दरमहा अंदाजे 3,969 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.
advertisement
3/7
त्याच वेळी, तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यावर तुम्हाला 35,950 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त फायदा देखील मिळू शकतो, जरी वास्तविक एक्सचेंज मूल्य फोनच्या स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असेल.
advertisement
4/7
फोनचे फीचर्स कसे आहेत? : स्पेसिफिकेशन्सविषयी बोलायचे झाल्यास Galaxy S25 Ultra 5G मध्ये 6.9 इंचाचा Dynamic LTPO AMOLED 2X डिस्प्ले मिळतो. जो 120Hz एडाप्टिव्ह रिफ्रेश रेट सपोर्ट करतो.
advertisement
5/7
फोनमध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर दिला आहे. जो हाय-अँड गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी बनवला आहे. यामध्ये 12GB RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज मिळते.
advertisement
6/7
कॅमेऱ्यांसाठी, यात 200MPचा प्रायमरी सेन्सर आहे. जो क्वाड-कॅमेरा सेटअपचा भाग आहे. याव्यतिरिक्त, 50MP पेरिस्कोप टेलिफोटो, 10MP टेलिफोटो आणि 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. फोनमध्ये सर्कल टू सर्च आणि लाईव्ह ट्रान्सलेट सारख्या गॅलेक्सी एआय फीचर्सना देखील सपोर्ट आहे.
advertisement
7/7
तुम्ही फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Galaxy S25 Ultra याच किंमतीत एक मजबूत ऑप्शन ठरु शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Samsung Galaxy S25 Ultraवर बंपर डिस्काउंट! किंमतीत 18,599 रुपयांपर्यंत सूट, पहिल्यापेक्षा खूप स्वस्त