TRENDING:

WIFI : किती वर्षांनी बदलावा WiFi राउटर? नाही बदललं तर काय परिणाम होतील? हे तुम्हाला माहित असायला हवं

Last Updated:
ज्याप्रमाणे मोबाईल आणि लॅपटॉप जुने होतात, तसेच तुमच्या WiFi राउटरचीही एक ठराविक वयोमर्यादा असते. जर तुमचा राउटर खूप जुना झाला असेल, तर तो बदलण्याची वेळ आली आहे, हे कसं ओळखायचं? जाणून घेऊया यामागचं विज्ञान आणि काही महत्त्वाचे संकेत.
advertisement
1/7
WIFI : किती वर्षांनी बदलावा WiFi राउटर? नाही बदललं तर काय परिणाम होतील? हे तुम्हाला माहित असायला हवं
आजच्या डिजिटल युगात अन्नापेक्षाही जास्त गरज वाटते ती म्हणजे हाय-स्पीड इंटरनेटची. मुलांचे ऑनलाइन क्लास असोत, तुमचं 'वर्क फ्रॉम होम' किंवा रात्री आरामात ओटीटीवर चित्रपट पाहणं सगळं काही एका वायफाय (WiFi) सिग्नलवर अवलंबून असतं. पण अनेकदा असं होतं की, आपण महागडा इंटरनेट प्लॅन घेतो, कंपनीला वारंवार फोन करतो, तरीही इंटरनेटचा स्पीड कासवाच्या गतीने चालतो. व्हिडिओ बफर व्हायला लागला की आपला संयम सुटतो. पण मित्रांनो, कधी विचार केलाय का की दोष तुमच्या इंटरनेट प्रोव्हायडरचा नसून, कोपऱ्यात धूळ खात पडलेल्या त्या राउटरचा असू शकतो?
advertisement
2/7
हो, ज्याप्रमाणे मोबाईल आणि लॅपटॉप जुने होतात, तसेच तुमच्या WiFi राउटरचीही एक ठराविक वयोमर्यादा असते. जर तुमचा राउटर खूप जुना झाला असेल, तर तो बदलण्याची वेळ आली आहे, हे कसं ओळखायचं? जाणून घेऊया यामागचं विज्ञान आणि काही महत्त्वाचे संकेत.
advertisement
3/7
राउटरचं रिटायरमेंट वय किती?साधारणपणे एका चांगल्या WiFi राउटरचं आयुष्य 3 ते 5 वर्षे मानलं जातं. या काळानंतर राउटरमधील अंतर्गत हार्डवेअरची क्षमता कमी होऊ लागते. तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे आणि जुने राउटर नवीन हाय-स्पीड लहरींना झेलू शकत नाहीत. जर तुमचा राउटर 4-5 वर्षांपेक्षा जास्त जुना असेल, तर तो आधुनिक इंटरनेट स्पीडसाठी आउटडेटेड ठरतो.
advertisement
4/7
जुना राउटर आणि स्लो स्पीडचं कनेक्शनवेळेनुसार राउटरच्या प्रोसेसरवर ताण येतो. महत्त्वाचं म्हणजे, जुने मॉडेल्स आधुनिक WiFi 5 किंवा WiFi 6 सारख्या तंत्रज्ञानाला सपोर्ट करत नाहीत. आजकाल घरात एकाच वेळी अनेक मोबाईल, स्मार्ट टीव्ही आणि लॅपटॉप कनेक्ट असतात. जुन्या राउटरची एवढी उपकरणं हाताळण्याची क्षमता नसते, ज्यामुळे इंटरनेटचा वेग विभागला जातो आणि सिग्नल कमकुवत मिळतो. तसेच, सतत चालू राहिल्यामुळे जुनी उपकरणं लवकर गरम होतात, ज्याचा थेट परिणाम परफॉर्मन्सवर होतो.
advertisement
5/7
'हे' 4 संकेत दिसले तर समजा राउटर बदलायची वेळ आलीयवारंवार रीस्टार्ट करावा लागणे: जर तुम्हाला दिवसातून दोन-तीनदा राउटर बंद करून चालू करावा लागत असेल, तर समजा त्याचं आयुष्य संपत आलं आहे.बफरिंगचा त्रास: हाय-स्पीड प्लॅन असूनही व्हिडिओ लोड व्हायला वेळ लागत असेल.रेंज कमी होणे: शेजारच्या खोलीत गेल्यावर सिग्नल गायब होणे किंवा रेंज कमी-जास्त होणे.कनेक्टिव्हिटी इश्यू: काही उपकरणांना WiFi कनेक्ट होतं, तर काहींना नाही, अशी समस्या वारंवार उद्भवणे.
advertisement
6/7
नवीन राउटर घेताना 'या' गोष्टींकडे द्या लक्षजर तुम्ही नवीन राउटर घेण्याचा विचार करत असाल, तर फक्त किंमत न पाहता तांत्रिक बाबी तपासा. नेहमी WiFi 5 किंवा WiFi 6 सपोर्ट असलेला राउटर निवडा. मोठ्या घरासाठी ड्युअल-बँड किंवा ट्राय-बँड राउटर सर्वोत्तम ठरतात, कारण ते अनेक उपकरणांना एकाच वेळी विनाअडथळा इंटरनेट पुरवू शकतात.
advertisement
7/7
डिजिटल विश्वात वेगवान राहण्यासाठी फक्त प्लॅन वाढवून चालत नाही, तर आपली साधनंही अद्ययावत असावी लागतात. एक नवीन आणि स्मार्ट राउटर केवळ तुमचा इंटरनेट स्पीडच वाढवत नाही, तर तुमचा एकंदरीत डिजिटल अनुभव अधिक सुखद आणि सुरक्षित बनवतो. त्यामुळे, जर तुमचा राउटर जुना झाला असेल, तर आजच त्याला निरोप द्या आणि हाय-स्पीड आयुष्याची सुरुवात करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
WIFI : किती वर्षांनी बदलावा WiFi राउटर? नाही बदललं तर काय परिणाम होतील? हे तुम्हाला माहित असायला हवं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल