TRENDING:

Weather Alert: ठाणे, कल्याण-डोंबिवलीत अचानक हवापालट, पुढील 24 तासांसाठी महत्त्वाचा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत असून थंडीची तीव्रता कमी झाली आहे. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
ठाणे, कल्याण-डोंबिवलीत अचानक हवापालट, पुढील 24 तासांसाठी महत्त्वाचा अलर्ट
महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून आता उन्हाळ्याची चाहुल लागल्याचे जाणवत आहे. सकाळी हलकासा गारवा टिकून असला, तरी दुपारी उन्हाचा चटका वाढत चालला आहे. पुढील काही दिवस राज्यभरात कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. शनिवारी असलेल्या तापमानाच्या तुलनेत रविवारपासून दिवसाच्या तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली परिसरातील 8 फेब्रुवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
ठाणे जिल्ह्यात रविवारी हवामान मुख्यत्वे उष्ण आणि दमट राहील. गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमान स्थिर असून 33-34 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस असेल. पुढील 4 दिवस कमाल तापमान एक अंकी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दिवसभरात अंशतः ढगाळ वातावरण असल्याने उष्णता जाणवेल.
advertisement
3/5
गेल्या आठवड्यापासून कडक उन्हाळा सुरू झाल्याचे चित्र असून आज कल्याण-डोंबिवलीत हवामान मुख्यत्वे कोरडे, उष्ण आणि स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. दिवसा कडक ऊन आणि आकाशात अंशतः ढग दिसू शकतात. त्यामुळे दुपारच्या वेळी थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे, आरोग्यासाठी भरपूर पाणी प्या.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भाग प्रामुख्याने कोरडे, स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित राहील. किमान तापमान 18-20 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 32-33 अंश सेल्सिअस राहील. सकाळ व रात्री हवामानात हलका गारवा, तर दुपारी उन्हाचे चटके जाणवू शकतात. त्यामुळे लहान मुलांसह इतर नागरिकांनी दुपारी बाहेर पडताना काळजी घ्यावी.
advertisement
5/5
बदलापूर शहरात आज हवामान सुखद आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 23 अंश सेल्सिअस, किमान तापमान 34 अंश सेल्सिअस असेल. दिवसभर कडक ऊन असल्याने उकाडा जाणवेल. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हवामान स्वच्छ आणि अंशतः ढगाळ असून, दिवसा ऊन राहील. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस असेल. पहाटे हवामान सुखद आणि थंड, तर दुपारी उकाडा जाणवेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
Weather Alert: ठाणे, कल्याण-डोंबिवलीत अचानक हवापालट, पुढील 24 तासांसाठी महत्त्वाचा अलर्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल