TRENDING:

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, मध्यरात्री सारं जमिनदोस्त... 622 जणांचा मृत्यू, भूकंपाने हादरलं अफगाणिस्तान, PHOTO

Last Updated:
अफगाणिस्तानच्या हिंदूकुश प्रदेशात 6 रिश्टरपेक्षा तीव्र भूकंप, 622 मृत, दीड हजार जखमी, नुरगल आणि आसपासच्या गावांमध्ये मोठं नुकसान, रेस्क्यू ऑपरेशन सुरू.
advertisement
1/7
मध्यरात्री सारं जमिनदोस्त... 622 जणांचा मृत्यू, भूकंपाने हादरलं अफगाणिस्तान, PHO
आपल्या लोकांना शोधण्यासाठी प्रचंड आक्रोश, चेहऱ्यावर भीती, आपलं माणूस शोधण्यासाठी धडपड, मध्यरात्री आभाळ कोसळावं तसं घराचं क्षण एका क्षणात खाली आलं. भिंती जमीनदोस्त झाल्या आणि होत्याचं नव्हतं झालं. गोंधळ, आरडा-ओरड आणि प्रचंड आक्रोश परिसरात पसरला होता. काही कळण्याआत अख्खं गावच्या गाव जमीनदोस्त झालं होतं.
advertisement
2/7
ही धक्कादायक घटना आहे अफगाणिस्तानमधली. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी उत्तर अफगाणिस्तान हादरुन गेलं. हे भूकंपाचे धक्के इतके मोठे होते की त्याचा परिणाम भारतात नोएडापर्यंत दिसून आला. नोएडापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले, मात्र दिल्सी आणि नोएडापर्यंत त्याची तीव्रता कमी झाली होती.
advertisement
3/7
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 622 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठी जीवितहानी झाली. इतकंच नाही तर दीड हजारहून अधिक लोक जखमी असून त्यांना तातडीनं उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पोहोचवण्यात आलं आहे. आजूबाजूच्या भागात जशी ही बातमी पसरली तसे लोक मदतीला धावले पण तोपर्यंत उशीर झाला होता.
advertisement
4/7
अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भूकंपाची तीव्रता 6 रिश्टर स्केलहून अधिक होती. याचं केंद्र जमिनीपासून खाली खोल 8 किमीवर असल्याची माहिती मिळाली आहे. घरांचं मोठं नुकसान झालं आहे. जीवितहानी देखील मोठी झाली आहे.
advertisement
5/7
आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की भूकंपाचे केंद्र कुनार प्रांतातील हिंदूकुश प्रदेशात होते, ज्यामुळे नुरगल, सुकी, वाटपूर, मानोगी आणि चापे-दारे सारख्या दुर्गम भागांवर मोठा परिणाम झाला आहे.
advertisement
6/7
स्थानिक अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की मृतांची संख्या वाढू शकते, कारण मदत आणि बचाव कार्य अद्याप काही गावांपर्यंत पोहोचलेले नाही. तिथे पोहोचण्यात अडथळे येत आहेत.
advertisement
7/7
या भूकंपाचे धक्के भारतातही जाणवले. मात्र त्याची तीव्रता कमी होती. या भूकंपामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, मध्यरात्री सारं जमिनदोस्त झालं आहे. यातला प्रत्येक फोटो दुर्घटना किती भीषण आहे ते सांगत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, मध्यरात्री सारं जमिनदोस्त... 622 जणांचा मृत्यू, भूकंपाने हादरलं अफगाणिस्तान, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल