General Knowledge : आमंत्रण आणि निमंत्रणमध्ये काय फरक? कधी काय वापरावं, तुम्हाला माहितीय का उत्तर?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
General Knowledge : अनेकदा लोकांचा गोंधळ उडतो की दोन्ही पैकी काय बरोबर आहे. काही लोक तर दोघांचाही एकच अर्थ समजून केव्हा ही कोणताही शब्द वापरतात. पण असं नाही.
advertisement
1/6

आग्रहाचे आमंत्रण किंवा निमंत्रण असलेली कार्यक्रमाची पत्रीका तुम्हला एकदा तरी नक्कीच मिळाली असेल. याला इंग्रजीत बोलायचं झालं तर आपण Invitaion Card असं म्हणतो. इंग्रजीत जरी याला एकच शब्दानं ओळखत असलो तरी मराठीत मात्र आमंत्रण किंवा निमंत्रण असे दोन शब्द आहेत.
advertisement
2/6
अशात अनेकदा लोकांचा गोंधळ उडतो की दोन्ही पैकी काय बरोबर आहे. काही लोक तर दोघांचाही एकच अर्थ समजून केव्हा ही कोणताही शब्द वापरतात. पण असं नाही. दोन्ही शब्दांचा वेगवेगळा अर्थ आहे आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात.
advertisement
3/6
जेव्हा एखादा नियोजित कार्यक्रमात कोणी आलं किंवा नाही आलं तरी चालतं, तुमच्या अनुपस्थीतीत हा कार्यक्रम पार पडणार असतो अशावेळी या कार्यक्रमाबद्दल फक्त सूचित करायचे असते तेव्हा मुख्यतः आमंत्रण हा शब्द वापरला जातो.
advertisement
4/6
पण जेव्हा ठराविक व्यक्तीच्या उपस्थतिथीशिवाय एखादा कार्यक्रम पार पडू शकत नाही, आणि हे जेव्हा सूचीत करायचे असते तेव्हा निमंत्रण हा शब्द वापरला जातो.
advertisement
5/6
याचाच अर्थ आग्रहाने कोणाला आपण बोलावतो आणि ती व्यक्ती आपल्यासाठी महत्वाची असते तेव्हा त्याला आपण निमंत्रण द्यायला हवे. पण खाद्या व्यक्तीला कार्यक्रमाबद्दल सांगणण्यासाठी तुम्ही आमंत्रण देऊ शकता.
advertisement
6/6
मराठी भाषेत असे असंख्य शब्द असतील जे आपल्याला गोंधळात टाकतील. पण हीच खरी भाषेतील गंमत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : आमंत्रण आणि निमंत्रणमध्ये काय फरक? कधी काय वापरावं, तुम्हाला माहितीय का उत्तर?