TRENDING:

travel tips : हे काही वॉलपेपर नाही! तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिली नसतील अशीही सुंदर ठिकाणं PHOTOS

Last Updated:
पृथ्वीच्या आर्क्टिक वृत्ताच्या खाली वसलेला आइसलँड म्हणजे जगातल्या सर्वांत सुंदर देशांपैकी एक. त्यात सुंदर नॅशनल पार्क्स आहेत आणि निसर्गाची असंख्य आश्चर्य आहेत.
advertisement
1/12
हे काही वॉलपेपर नाही! तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिली नसतील अशीही ठिकाणं PHOTOS
पृथ्वीच्या आर्क्टिक वृत्ताच्या खाली वसलेला आइसलँड म्हणजे जगातल्या सर्वांत सुंदर देशांपैकी एक. त्यात सुंदर नॅशनल पार्क्स आहेत आणि निसर्गाची असंख्य आश्चर्य आहेत. धाडसी व्यक्ती, तसंच निसर्गप्रेमींसाठी हा देश पर्यटनासाठी उत्तम आहे. तसंच तिथली संस्कृतीही काही वेगळ्या गोष्टी सांगू पाहते. 'लँड ऑफ फायर अँड आइस' असं म्हटलं जाणाऱ्या आइसलँडला भेट देऊ इच्छिणाऱ्यांनी जरूर पाहावीत, अशा काही ठिकाणांची माहिती इथे देत आहोत
advertisement
2/12
अल्डेजारफॉस : आइसलँडच्या उत्तरेकडच्या उंचावरच्या भागात वसलेला अल्डेजारफॉस हा फारसा प्रसिद्ध नसलेला धबधबा आहे. आजूबाजूला असलेल्या बेसॉल्ट खडकाच्या पार्श्वभूमीवर हा धबधबा 66 फूट उंचीवरून बर्फाळ तळ्यात कोसळतो. 9000 वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या Báðardalshraun या पुरातन लाव्हा फिल्डमध्ये अल्डेजारफॉसचा उगम आहे.
advertisement
3/12
ऑरोरा बोरिअ‍ॅलिस : नॉर्दर्न लाइट्स या नावाने ओळखलं जाणारं हे आश्चर्य पाहण्यासाठी पर्यटक खूप उत्सुक असतात. अणूंमुळे दिसणारे हे नैसर्गिक प्रकाशझोत हिवाळ्यातल्या निरभ्र आकाशात स्पष्टपणे दिसतात. पूर्ण आइसलँडमध्ये हे आश्चर्य अनुभवता येतं; मात्र देशाच्या वायव्येच्या टोकाला असलेल्या Grótta लाइटहाउस इथे हे दृश्य अधिक उत्तम दिसू शकतं.
advertisement
4/12
- क्रिस्टल आइस केव्ह : पृथ्वीवर अन्यत्र कुठेही अनुभवात येणार नाहीत अशी अनेक आश्चर्यं आइसलँडमध्ये आहेत. त्यांपैकी एक म्हणजे क्रिस्टल आइस केव्ह अर्थात बर्फाच्या क्रिस्टल्सची गुहा. दक्षिण आइसलँडमधल्या या गुहेला Breiðamerkurjökull Cave असंही म्हणतात. हे आश्चर्य Vatnajökull नावाच्या हिमनदीत आहे. ही नदी देशातली सर्वांत मोठी आहे. ही नैसर्गिक गुहा 1200 वर्षांपूर्वी तयार झाली आहे.
advertisement
5/12
गेसिर हॉट स्प्रिंग एरिया : दक्षिण आइसलँडमधल्या हॉकादलुर व्हॅलीमध्ये गेसिर हॉट स्प्रिंग एरिया आहे. ते जिओथर्मल फिल्ड असून, एक हजारहून अधिक वर्षांपूर्वी सक्रिय झालं आहे. तिथे बुडबुडे येणारे चिखलाचे अनेक खड्डे आहेत. गरम पाण्याच्या झऱ्यांच्या ठिकाणचं दृश्य उत्तम आहे. स्ट्रोक्कुर हे तिथलं आणखी एक आश्चर्य असून, तिथून दर काही मिनिटांनी 100 फूट उंच हवेचे फवारे उडतात.
advertisement
6/12
गल्फॉस : गोल्डन फॉस किंवा गल्फॉस हा आइसलँडमधला सर्वांत प्रसिद्ध धबधबा आहे. दक्षिण आइसलँडमधल्या नक्की पाहाव्यात अशा तीन ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे. तीव्र पुरामुळे या भागातल्या जमिनीच्या बेसॉल्ट लाव्हाच्या थरांमध्ये पाणी गेलं आणि खिंड तयार झाली. त्यामुळे 105 फुटांचा धबधबा तयार झाला. तो दोन टप्प्यांत कोसळतो. दर सेकंदाला त्यातून अंदाजे 140 घनमीटर एवढं पाणी पडत असतं.
advertisement
7/12
Hallgrímskirkja : रेक्जाविक हे आइसलँडच्या राजधानीचं शहर तिथली खास लाकडी घरं, वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालयं, जागतिक दर्जाची रेस्तराँ यांसाठी ओळखलं जातं. तसंच, जगातल्या सर्वोत्तम चर्चेसपैकी एक चर्चही तिथे आहे. त्याचं नाव Hallgrímskirkja. शहराच्या मध्यभागी दिमाखात उभं असलेलं हे चर्च तिथल्या बेसॉल्ट कॉलम रॉक फॉर्मेशनचं वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण दाखवतं. बाकीच्या नैसर्गिक आश्चर्यांसोबतच आइसलँडमध्ये हे चर्च पाहायला दर वर्षी हजारो पर्यटक येतात.
advertisement
8/12
हॉर्नब्जार्ग : ही एक क्लिफ असून, तिच्या खाली समुद्र आहे. काल्फातिंदूर (534 मी.) आणि जोरुंदुर (429 मी.) ही त्याची दोन उत्तुंग शिखरं आहेत. इथलं निसर्गसौंदर्य उत्तम असून, आर्क्टिक प्रदेशातले कोल्हेही तिथे पाहायला मिळतात.
advertisement
9/12
Hverfjall : उत्तर आइसलँडमध्ये Hverfjall हे आश्चर्य पाहायला मिळतं. हा नामशेष झालेला ज्वालामुखी 2500 वर्षांपूर्वीचा आहे. त्याच्यामुळे तयार झालेलं मोठं विवर तिथे पाहायला मिळतं. त्याचा व्यास सुमारे एक किलोमीटरचा आहे.
advertisement
10/12
Reynisfjara बीच : हे नाव 'गेम ऑफ थ्रोन्स'मुळे प्रसिद्ध झालं. देशातल्या सर्वोत्तम लँडस्केप्सपैकी एक असलेलं हे ठिकाण आइसलँडच्या दक्षिण किनाऱ्यावर आहे. विक नावाच्या फिशिंग व्हिलेजच्या जवळ हे ठिकाण आहे. काळ्या वाळूच्या या बीचवर बेसॉल्टच्या क्लिफ्स आहेत.
advertisement
11/12
Stuðlagil Canyon : आइसलँडमधल्या नैसर्गिक आश्चर्यांपैकी Stuðlagil Canyon हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे. उंच भागातून देशाच्या उत्तरेकडे हिमनदीने काढलेल्या मार्गामुळे पुरातन व्होल्कॅनिक खडकांमध्ये ही घळ तयार झाली आहे. याला बेसॉल्ट कॉलम कॅन्यन असंही म्हटलं जातं.
advertisement
12/12
द ब्लू लगून : रेक्जाविकला लागूनच असलेलं द ब्लू लगून हे आइसलँडचं लोकप्रिय आणि युनिक आकर्षण आहे. लाव्हा फिल्डमध्ये असलेला हा नॅचर थर्मल पाँड अर्थात गरम पाण्याचा तलाव आहे. 1992मध्ये तिथे स्पा झाला. आता तिथे लक्झरी हॉटेल, रेस्तराँही आहे. 2012मध्ये जगातल्या 25 आश्चर्यांत नॅशनल जिओग्राफिकने या आश्चर्याचा समावेश केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
travel tips : हे काही वॉलपेपर नाही! तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिली नसतील अशीही सुंदर ठिकाणं PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल