Ram Navami 2026 Horoscope: रामनवमीला ग्रहांचा खास संयोग, श्रीरामाची कृपा या राशींवर अपार, लाईफ चेंजिंग वेळ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ram Navami 2026 Horoscope: मराठी पंचागानुसार मध्यान्हकाली चैत्र शुक्ल नवमी असेल त्यादिवशी श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो. यावर्षी गुरुवारी 26 मार्च रोजी मध्यान्हकाली चैत्र शुक्ल नवमी आहे म्हणून त्याचदिवशी श्रीराम नवमी साजरी करायची आहे. 26 मार्च रोजी सकाळी 11.49 वाजता चैत्र शुक्ल नवमी सुरू होत असून त्याच दिवशी मध्यान्हकालात चैत्र शुक्ल नवमी आहे.
advertisement
1/5

म्हणजेच गुरुवारी 26 मार्च रोजीच श्रीराम नवमी साजरी करावयाची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी अनेक खास ज्योतिषीय योग जुळून येत असल्याने या दिवसाचे महत्त्व अजूनच वाढले आहे.
advertisement
2/5
रामनवमीला ग्रहांची स्थिती कशी असेल?या दिवशी ग्रहांची स्थिती खूप खास असणार आहे. शुक्र ग्रह मेष राशीत प्रवेश करेल, तर गुरु आणि चंद्राच्या भेटीमुळे गजकेसरी योग तयार होईल. तसेच गुरू ग्रह आणि मंगळ एकत्र आल्याने 'नवपंचम राजयोग' बनेल. काही राशींमध्ये 'त्रिग्रही योग' देखील तयार होत आहे. या सर्व योगांचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर पाहायला मिळेल. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी यंदाची रामनवमी विशेष भाग्याची ठरेल.
advertisement
3/5
या राशींसाठी दिवस शुभ राहील - यावेळेस रामनवमीचा दिवस मेष, वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. बऱ्याच काळापासून चालत आलेल्या कटकटींतून सुटका मिळेल, आयुष्यात आनंद वाढेल. घरातील वाद मिटून रिलेशन छान टवटवीत होईल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल, ज्यामुळे बढती किंवा नवीन मोठी जबाबदारी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायातही चांगला नफा होऊ शकतो. पैशांची आवक चांगली असेल, मानगुटीवरील कर्जातून एकदाची सुटका मिळू शकते.
advertisement
4/5
या व्यतिरिक्त मिथुन, कुंभ, तूळ, मकर आणि सिंह राशीच्या लोकांसाठीही हा दिवस चांगले फळ देणारा ठरेल. मात्र, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी आरोग्याच्या बाबतीत थोडे सावध राहणे गरजेचे आहे. कामावर मात्र याचा कोणताही वाईट परिणाम होणार नाही.
advertisement
5/5
रामनवमीला कोणते उपाय करावे - जीवनात प्रभू श्रीरामांची कृपा मिळवायची असेल, तर काही सोपे उपाय करू शकता. रामचरितमानसच्या बालकांडाचे वाचन करणे खूप शुभ मानले जाते. प्रभू रामाला तुळशीच्या पानांची माळ अर्पण करा. तसेच हनुमान चालीसाचे पठण केल्यानेही जीवनात चांगले बदल घडू येऊ लागतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Ram Navami 2026 Horoscope: रामनवमीला ग्रहांचा खास संयोग, श्रीरामाची कृपा या राशींवर अपार, लाईफ चेंजिंग वेळ