50 वर्ष लहान अभिनेत्रीला केलं किस, गोत्यात आलेला 70 वर्षीय अभिनेता, आता फिल्म करतेय छप्परफाड कमाई
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Controversy: एकीकडे या फिल्मने अनेक रेकॉर्ड्स मोडले असतानाच, दुसरीकडे मात्र या फिल्ममधील एका कलाकारावर नेटकऱ्यांनी टीकेची तोफ डागली होती.
advertisement
1/9

मुंबई : आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर धुरंधर २ ची घोडदौड सध्या तुफान सुरू आहे. जगभरात ८०० कोटींहून अधिकची कमाई केलेल्या या फिल्मने प्रत्येकालाच आपले फॅन बनवले आहे. सर्वच स्तरातून या फिल्मचे खूप कौतुक होत आहे.
advertisement
2/9
मात्र एकीकडे या फिल्मने अनेक रेकॉर्ड्स मोडले असतानाच, दुसरीकडे मात्र या फिल्ममधील एका कलाकारावर नेटकऱ्यांनी टीकेची तोफ डागली होती. फिल्ममध्ये 'जमील जमाली' हे पात्र साकारणारे ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांना पहिल्या भागाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाच्या वेळी घडलेल्या एका घटनेमुळे नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली होती.
advertisement
3/9
धुरंधरच्या पहिल्या भागाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात फिल्ममधील सर्व कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी राकेश बेदी यांच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या सारा अर्जुनसोबत राकेश बेदी यांनी केलेले वर्तन नेटकऱ्यांना अजिबात आवडले नाही.
advertisement
4/9
राकेश बेदी यांनी या कार्यक्रमात साराला अभिवादन करताना तिला हग केले आणि तिला किस केले. दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि त्यानंतर नेटकऱ्यांनी राकेश यांना ट्रोल करायला सुरुवात केली.
advertisement
5/9
विशेष म्हणजे, ७० वर्षीय राकेश यांनी २० वर्षीय साराला अशाप्रकारे मिठी मारणे अजिबात पटलेले नव्हते. तथापि, स्वतः राकेश बेदी यांनी या ट्रोलिंगवर मौन सोडत आपली बाजू मांडली होती.
advertisement
6/9
एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, "माझ्या वागण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. सारा अर्जुनने चित्रपटात माझ्या मुलीची भूमिका साकारली आहे. शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून आमचे नाते वडील आणि मुलीसारखेच आहे. सेटवर जेव्हा ती यायची, तेव्हा मी तिला प्रेमाने मिठी मारून तिच्या कपाळावर चुंबन घ्यायचो. हे केवळ वडिलांच्या प्रेमापोटी होते."
advertisement
7/9
ट्रेलर लाँचच्या घटनेबद्दल ते म्हणाले, "स्टेजवरही मी तिला त्याच मायेने जवळ घेतले होते. मी नेहमीच तिला सांगायचो की, काळजी करू नकोस, आपण मिळून हा सीन छान करूया. पण सोशल मीडियावर लोक काहीही बोलतात. लोकांचे कामच आहे बोलणे. सुदैवाने, काही समजूतदार लोकांनी माझी बाजू समजून घेतली आणि माझे समर्थन केले."
advertisement
8/9
राकेश बेदी यांनी या चित्रपटात साकारलेले 'जमील जमाली' हे पात्र सध्या चांगलेच गाजत आहे. एकीकडे पाकिस्तानी नेते नबील गबोल या पात्रावर नाराज असताना, दुसरीकडे प्रेक्षकांनी राकेश बेदींच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.
advertisement
9/9
या वादाबद्दल बोलताना ते म्हणाले की, चित्रपटाला जे अभूतपूर्व यश मिळाले आहे, ते एन्जॉय करणे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. अशा प्रकारचे यश एखाद्या अभिनेत्याच्या किंवा दिग्दर्शकाच्या आयुष्यात फार कमी वेळा येते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
50 वर्ष लहान अभिनेत्रीला केलं किस, गोत्यात आलेला 70 वर्षीय अभिनेता, आता फिल्म करतेय छप्परफाड कमाई