TRENDING:

मराठी अभिनेत्रीच्या पायाला मोठी दुखापत, वॉकरचा आधार, पायाला फ्रॅक्चर; तरी करतेय काम , PHOTO

Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र शो मस्ट गो ऑन म्हणत ती स्टेजवर उभी राहून नाटकात काम करतेय.
advertisement
1/8
मराठी अभिनेत्रीच्या पायाला मोठी दुखापत, वॉकरचा आधार, पायाला फ्रॅक्चर; तरी करतेय काम , PHOTO
शो मस्ट गो ऑन हे वाक्य अनेकदा सगळेच आपल्या आयुष्यात वापरतात. पण कलाकारांना हे वाक्य कायम आपल्या घेऊन चालावं लागतं. काही झालं तरी दिलेली कमिटमेन्ट पूर्ण करावी लागते.
advertisement
2/8
अनेक कलाकारांचे अनुभव आजवर आपण ऐकले आहेत की बरं नसतानाही त्यांनी त्यांचं काम त्याच एनर्जीनं पूर्ण केलं. असंच काहीसं घडलं आहे अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्याबरोबर.
advertisement
3/8
अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. तिचा पाय फ्रँक्चर झाला आहे. पण कलेवरच्या प्रेमानं तिला शांत बसू दिलं नाही. शिवानी रांगोळेच्या पायाला दुखापत झालेली असताना देखील ती नाटकाचे प्रयोग करत आहे. नुकतीच तिनं पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली.
advertisement
4/8
शिवानी रांगोळे सध्या भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्याबरोबर शंकरजयकिशन या नाटकात काम करत आहे. तिच्या पायाला दुखापत झालेली असताना देखील ती काम करत आहे. काम करत असताना तिला आलेला अनुभव तिनं शेअर केला आहे. सेटवर तिला कलाकारांची आणि संपूर्ण टीमची कशी मदत झाली हे देखील सांगितलं.
advertisement
5/8
शिवानीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "नाटक करायला एका पायावर तयार! पायाला दुखापत झाली तेव्हा प्रयोग कसे होणार ह्याचं टेन्शन होतं. पण नाट्यगृहात पाय ठेवण्याच्या क्षणापासून ते मेकअप रूममध्ये मला तयार होताना मदत करणं, नाटका आधीचा जो प्रॉपर्टी चेक मी करते तो माझ्या वतीने करून ठेवणं."
advertisement
6/8
"मला चालायला वेळ लागतो म्हणून ब्लॅकआउटचा अवधी वाढवणं,नाटकात काही मूव्हमेंट्स ऐनवेळी माझ्या सोयीनी बदलणं, नाटक झाल्यावर मला गाडीपर्यंत सुखरूप सोडणं, हे सगळं माझ्या शंकर जयकिशनच्या सगळ्या टीमनी केलं."
advertisement
7/8
शिवानी पुढे म्हणाली "मला कित्येकदा पायात splinter आहे ह्याची जाणीव ही व्हायची नाही,उत्साहात मी स्टेजवर वावरायचे तेव्हा भरत जाधव सर आणि महेश मांजरेकर सर मला आठवण करून द्यायचे, मला सांभाळून घ्यायचे! तेव्हा खूप कृतज्ञता वाटली!"
advertisement
8/8
"स्टेज वर जाईपर्यंत टेन्शन असायचं की पायामुळे प्रयोग कसा होईल, पण एकदा प्रेक्षकांचा आवाज ऐकला की हुरूप यायचा! आता हळूहळू recovery होते आहे पण माझ्या टीमसाठी आणि प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात!"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मराठी अभिनेत्रीच्या पायाला मोठी दुखापत, वॉकरचा आधार, पायाला फ्रॅक्चर; तरी करतेय काम , PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल