Mobile Interesting Facts : मोबाईल कव्हरमुळे फोनचा सिग्नल कमी होतो का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mobile Interesting Facts : मोबाईल कव्हरमुळे फोनचं सिग्नल कमी होतं का? या प्रश्नाचं उत्तर हो आणि नाही अशा दोन्ही प्रकारचं आहे. कारण हे पूर्णपणे फोन कव्हरच्या प्रकारावर अवलंबून असतं.
advertisement
1/8

मोबाईलच्या आत अँटेना असतो, जो जवळच्या मोबाईल टॉवरशी रेडिओ वेव्हद्वारे संपर्क साधतो. हे सिग्नल खूप नाजूक असतात. जर अँटेना आणि टॉवरच्या मधे काही अडथळा आला तर सिग्नल कमी होऊ शकतो.
advertisement
2/8
जर फोन कव्हर मेटल किंवा मॅग्नेटिक प्लेटचा असेल तर अशा कव्हरमुळे सिग्नल कमी होऊ शकतो. कारण मेटल रेडिओ वेव्ह्जला अडथळा निर्माण करतो. अँटेनाच्या जवळ मेटल असेल तर सिग्नल परावर्तित होतो किंवा शोषला जातो.
advertisement
3/8
खूप जाड कव्हर ज्यामध्ये हार्ड प्लॅस्टिक, रबर, मल्टीप लेयर्स असतात तेदेखील थोड्याफार प्रमाणात सिग्नलवर परिणाम करू शकतात. विशेषतः जिथं नेटवर्क एरिया चांगला नाही, जसं की बेसमेंट, लिफ्ट, गावय
advertisement
4/8
काही कव्हर रेडिएशन प्रोटेक्शन म्हणून विकले जातात. अशा कव्हरमध्ये खास मटेरिअल वापरलेले असतं, जे रेडिएशन कमी करतं. पण त्याचबरोबर सिग्नलसुद्धा कमी करू शकतात.
advertisement
5/8
आज सर्वाधिक वापरले जाणारे सिलिकॉन, टीपीयू, सॉफ्ट प्लॅस्टिक कव्हर यांचा सिग्नलवर काहीही परिणाम होत नाही. कारण हे रेडिओ वेव्ह्ज सहज पास होऊ देतात.
advertisement
6/8
कंपनीचे ओरिजनल कव्हर स्लिपम आणि कमी वजानचे असतात. हे फोनच्या अँटेना डिझाइन लक्षात घेऊन तयार केलेल असतात. त्यामुळे सिग्नल कमी होण्याचा प्रश्न सहसा येत नाही.
advertisement
7/8
जर फोन कव्हरमुळे सिग्नल कमी झाला तर नेटवर्क बार कमी दिसणं, कॉल ड्रॉप होणं, इंटरनेट स्लो होणं, इंडोअर एरियामध्ये नेटवर्क न मिळणं, बॅटरी लवकर ड्रेन होणं, फोन टॉवर शोधत राहणं, अशी लक्षणं दिसतात.
advertisement
8/8
आता कव्हरमुळेच सिग्नल कमी होतो आहे हे कसं ओळखायचं तर यासाठी सोप्या टेस्ट करा. फोन कव्हर काढा आणि त्याच ठिकाणी सिग्नल बार्स तपासा आणि क़ल किंवा इंटरनेट स्पीड टेस्ट करा. पुन्हा कव्हर लावून ही टेस्ट करा. जर फरक जाणवला, तर सिग्नल कमी होण्यास कव्हर कारणीभूत असू शकतो. तो बदलणंच चांगलं. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)