खतरनाक पद्धतीने शिकार करतो हा जीव, वाचूनच अंगाचं पाणी पाणी होईल; याला मारलं नाहीतर...
- Published by:Priya Lad
Last Updated:
हा जीव दिसायला जितका विचित्र तितकाच खतरनाक आहे.
advertisement
1/5

सामान्यपणे मोठे जीव पाहिले ही भीती वाटते, पण छोटे जीव असतील तर त्यांची भीती वाटत नाही. पण काही छोटे जीवच इतके खतरनाक असतात की तुम्ही विचारही केला नसाल. असाच हा जीव. जो दिसायला इतकासा पण त्याची शिकारीची पद्धत इतकी खतरनाक आहे, की अंगाचं पाणी पाणी होईल.
advertisement
2/5
पावसाळ्यात तुम्ही साप, घोण, गांडुळ अशा जीवांना पाहिलं असेल. याच प्रजातीतील हा जीव आहे. ज्याला हॅमरहेड म्हटलं जातं. दिसायला गांडुळसारखाच पण गांडुळासारखे त्याचे फायदे नाहीत तर तो खूप खतरनाक आहे. त्याची शिकारीची पद्धत खूप भयंकर आहे.
advertisement
3/5
याच्या नावावरूनच त्याचं वैशिष्ट्य समजेल. हॅमरहेड म्हणजे हातोड्यासारखं डोकं असलेला. याला तुम्ही नीट पाहिलं तर त्याच्या एका टोकाला हातोड्यासारखा आकार दिसतो आहे.
advertisement
4/5
हा फार मोठा नसतो. तो जेलसारखा असतो. त्याची शिकार करण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. शिकार दिसताच तो शरीरातून एक चिकट द्रव सोडतो, त्यात टेट्रोडोटॉक्सिन नावाचं केमिकल असतं. हा द्रव शिकाऱ्याचं पाणी करतो आणि हे पाणी पिऊन हॅमरहेड आपली भूक मिटवतो.
advertisement
5/5
माणूस किंवा प्राण्यांसाठी हे धोकादायक नाहीत. पण झाडाझुडुपांना हानी पोहोचू शकते. कारण सामान्यपणे हा गांडुळांना खातो. गांडुळ शेतकऱ्यांसाठी फायदेशीर त्यामुळे गांडुळांना खाणारा हा जीव जिवंत राहिल्यास यामुळे गांडुळ नष्ट होतील. जर याला मारलं नाही तर हा जीव पर्यावरणाचा शत्रूच ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
खतरनाक पद्धतीने शिकार करतो हा जीव, वाचूनच अंगाचं पाणी पाणी होईल; याला मारलं नाहीतर...