काय म्हणाले राज ठाकरे?
'मुंबईमध्ये प्रकल्प लादण्याचं काम सुरू आहे. तुम्ही मुंबईचे मालक आहात. प्रकल्प लादण्याआधी विचारलं जात नाही, तुम्ही मालक पण तुम्हाला किंमत नाही. स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या. विकास आराखडा होतो मात्र टाऊन प्लानिंग होत नाही. तुम्ही हक्काची जमीन देऊन टाकता. तुम्ही प्रश्न विचारत नाही, तुमचा एकोपा असेल तर तुमच्या हाताला काहीतरी लागेल. तुमच्यातली फूट बिल्डरांना हवीच असते. गोड बोलून जमिनी काढून घेतल्या जातात', असं राज ठाकरे म्हणाले.
advertisement
'10 वर्षांचं प्लानिंग करून काही होत नाही, राष्ट्रासाठी 200-300 वर्षांचं प्लानिंग करावं लागतं. विकासाला विरोध नाही, पण हे सगळं कशासाठी? मुंबईमध्ये इथल्यांपेक्षा बाहेरून आलेलेच जास्त. मुंबईपेक्षा बाहेरून आलेल्यांवर खर्च जास्त. बाहेरून आलेल्या लोकांमुळे सोयी-सुविधा अपुऱ्या पडत आहेत', असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे.
'लोकसंख्येमध्ये बाहेरची लोकच जास्त आहेत. मुंबई बाहेरून आलेल्यांची संख्या जास्त आहे. सध्या मुंबईमधला माणूस बेघर होतोय आणि बाहेरच्यांना कडेवर कसं घेणार? फक्त ठाणे जिल्ह्यातच 8 महापालिका आहेत, ठाणेकरांनी इतकी लोकसंख्या वाढवली का? देशभरातून लोक ठाण्यात येतात. सगळा खर्च या शहरातल्या लोकसंख्येवर होतो. आपला सर्व पैसा महाराष्ट्राला मिळत नाही आपला शेतकरी आत्महत्या करत आहे', असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
अरबी समुद्रात शिवरायांचा पुतळा बांधण्याची घोषणा काँग्रेस सरकार असताना केली गेली. हा पुतळा अमेरिकेच्या स्टॅट्यू ऑफ युनिटीपेक्षा मोठा असेल असं सांगितलं गेलं. त्यावेळी अरबी समुद्रातल्या पुतळ्याला विरोध करणारा एकमेव राज ठाकरे होता. शिवरायांचा पुतळा बांधण्यापेक्षा त्यांचे गडकिल्ले नीट करा. सत्ताधारी-विरोधक फक्त राजकारण करतात. इथे येणाऱ्यांना फक्त पुतळे दाखवणार का इतिहास? असा सवालही राज ठाकरेंनी विचारला आहे.