TRENDING:

रात्रीचा अंधार अन् 390 फूट खोल दरीत श्रेयाची डेडबॉडी, अशक्य अशा ठिकाणी 'तो' पोहोचला; रेस्क्यूची INSIDE STORY

Last Updated:

लोणावळ्यातील ड्युक्स नोज दरी ही जवळपास ३९० फूट खोल आहे. त्यामुळे इथंपर्यंत जाणं सहज शक्य नव्हतं.   

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गणेश दुडम, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पुणे : ताम्हिणी घाटामध्ये पुण्यातील ६ तरुणांची महिंद्रा थार कोसळली होती. पण, ७२ तास ताम्हिणी घाटामध्ये काय घडलं, याचा अंदाज लागला नव्हता. अखेरीस, जिथे माणूस जाऊ शकत नाही, तिथे ड्रोनच्या मदतीने गाडीचा शोध लागला होता. आता अशीच एक घटना लोणावळ्यातील टायगर पॉईंट परिसरात घडली आहे. एका १९ वर्षीय तरुणीने टायगर पॉईंट परिसरात दरीत उडी मारून जीवन संपवलं. या तरुणीच्या मृतदेह शोधासाठी अत्याधुनिक ड्रोनची मदत घेण्यात आली होती. अखेरीस ३९० फूट खोल दरीत मृतदेह सापडला.

advertisement

पुण्यातील लोणावळ्यामध्ये पर्यटकांची नेहमी गर्दी असते. ३१ जानेवारी रोजी नवी मुंबईतील बेलापूर इथं राहणारी श्रेया पटी ही १९ वर्षीय तरुणी ट्रेकिंगसाठी आली होती. दिवसभर श्रेया लोणावळ्याच्या परिसरात फिरत होती. रात्री लोणावळ्याच्या टायगर पॉईंटच्या आली होती. त्यावेळी  ड्युक्स नोज परिसरात तिने खोल दरीत उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली. कौटुंबिक वादातून श्रेयाने हे पाऊल उचललं असल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement

बेपत्ता श्रेयाचा असा सुरू झाला शोध

३१ जानेवारी २०२६ रोजी श्रेया पटी ही बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती.  ३१ जानेवारीच्या संध्याकाळी ही घरी परतली नव्हती. त्यामुळे तिचा सगळीकडे शोध सुरू झाला. लोणावळ्यात कुटुंबीय पोहोचले आणि सगळी शोध सुरू केला. दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी नातेवाईकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात श्रेया बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असता टायगर पॉईंट परिसरात एका हॉटेलच्या मागे श्रेयाची बॅग सापडली होती. त्यानंतर डॉग स्कॉडला पाचरण करण्यात आलं. श्वानांनी ड्युक्स नोज दरीपर्यंत धाव घेतली. त्यामुळे पुढे काय घडलं याचा अंदाज सगळ्यांना आला होता.

advertisement

ड्रोनची मदत

लोणावळ्यातील ड्युक्स नोज दरी ही जवळपास ३९० फूट खोल आहे. त्यामुळे इथंपर्यंत जाणं सहज शक्य नव्हतं.   सकाळी ११.३० वाजता रेस्क्यू टीमला शोध मोहिमेसाठी पाचारण करण्यात आलं. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने घटनास्थळी पोहोचून दुपारी २.३० वाजता शोध मोहीम सुरू केली. डॉग स्क्वॉड, पोलीस ड्रोन आणि नंतर लाइटनिंग ड्रोनच्या सहाय्याने शोध सुरू झाला. ड्रोनच्या मदतीने खोल दरीत जाऊन पाहणी करण्यात आली, तेव्हा एका ठिकाणी श्रेयाचा मृतदेह आढळून आला.

advertisement

मृतदेह काढण्याची मोहीम सुरू

रात्रीचा अंधार झाल्यामुळे दरीतून श्रेयाचा मृतदेह बाहेर काढण्याचं मोठं आव्हान समोर होतं. अंधार असतानाही अत्यंत कठीण परिस्थितीत दोरी, स्ट्रेचर आणि वॉकी-टॉकीच्या सहाय्याने अखेरीस मृतदेह सुरक्षितपणे वर काढण्यात आला. रात्री ९.३० वाजता मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ही संपूर्ण शोध मोहीम पोलीस प्रशासनाच्या आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या धाडसाने यशस्वी झाली.

श्रेयाने का केली आत्महत्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंब आणि आल्याला काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करताना या ठिकाणी तपासणी केली असता, पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे की, पटी कुटुंबामध्ये अंतर्गत कलह सुरू होता. त्यामुळे श्रेयाला हा त्रास सहन झााला नाही. त्यामुळे तीने ट्रेकिंगसाठी जात असल्याचं सांगून लोणावळा गाठलं. परिवारातील अंतर्गत कलहामुळे नेहमी तणावात राहणारी श्रेया पटी  नवीमुंबईवरून ३१ जानेवारीला लोणावळ्यात आली आणि  जीवन यात्रा संपवली. मात्र, श्रेयाचा मोबाईल आणि लॅपटॉप अजूनही लॉक असल्याने त्यामुळे महत्वाचे पुरावे गोळा करण्यास अडचण येत आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
रात्रीचा अंधार अन् 390 फूट खोल दरीत श्रेयाची डेडबॉडी, अशक्य अशा ठिकाणी 'तो' पोहोचला; रेस्क्यूची INSIDE STORY
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल