TRENDING:

अंगावर भगवे कपडे, महिलेला जाळ्यात ओढलं, 2 भोंदुंना आजोबांनी धू धू धुतलं, पुण्यातील VIDEO VIRAL

Last Updated:

Crime in Pune: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे काळे कारनामे आणि अश्लील कृत्य उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन तोडकर, प्रतिनिधी खेड: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे काळे कारनामे आणि अश्लील कृत्य उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद आता पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात उमटताना दिसत आहेत. बुवाबाजी आणि धर्माच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तथाकथित महाराजांना एका आजोबांनी चोप दिला आहे. त्यांनी हाताने आणि काठीने मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
khed news
khed news
advertisement

व्हायरल व्हिडीओमध्ये एक वयोवृद्ध आजोबा दोन भोंदुबाबांना मारहाण करताना दिसत आहे. दोन्ही भोंदुंनी एका महिलेच्या घरी जाऊन तिची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. मात्र ही बाब आजोबांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दोन्ही भोंदुंना रस्त्यात गाठून मारहाण केली आहे. यावेळी दोन्ही भोंदुबाबा झालेल्या चुकीसाठी माफी मागून सोडून देण्याची विनंती करत आहेत. मात्र आजोबांनी त्यांना काठीने मारत चांगलाच धडा शिकवला आहे.

advertisement

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पाईट-सावंतवाडी परिसरात घडली आहे. येथे एका फिरस्त्या बाबाने एका महिलेला जाळ्यात ओढून तिची पाच हजार रुपयांची फसवणूक केली. भविष्य सांगण्याच्या किंवा घरातील बाधा दूर करण्याच्या बहाण्याने त्याने ही रक्कम उकळली होती. मात्र, खरात प्रकरणामुळे आधीच सावध असलेल्या स्थानिकांना या बाबाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दर पडलेलेच, लिंबाला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिक आक्रमक झाले. संतापलेल्या ग्रामस्थांनी या भोंदू बाबाला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेनंतर खेड तालुक्यातील सुजाण नागरिकांनी आवाहन केलं आहे की, कोणाही अनोळखी व्यक्तीवर किंवा चमत्काराचा दावा करणाऱ्या बाबांवर विश्वास ठेवू नका. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
अंगावर भगवे कपडे, महिलेला जाळ्यात ओढलं, 2 भोंदुंना आजोबांनी धू धू धुतलं, पुण्यातील VIDEO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल