TRENDING:

मान, चेहरा आणि पायाचे लचके तोडले, 15 मिनिटांत शोभाने सोडला जीव, आधी खून वाटला; CCTV पाहिल्यावर पोलीसही हादरले

Last Updated:

या भीषण हल्ल्यात प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि अवघ्या १५ मिनिटांतच त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी त्यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्याने

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन तोडकर, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पुणे : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहे. अशातच पुण्याच्या चाकण परिसरातून एक मन सुन्न करणारी  घटना समोर आली आहे. आंबेठाण चौक परिसरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने केलेल्या हल्ल्यात एका ३२ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. मध्यरात्री घडलेला हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

advertisement

चाकणमधील स्पार्क मिंडा कंपनीत कामाला असलेल्या शोभा वाघमारे सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आंबेठाण चौकातील उड्डाणपुलाखालून जात होत्या. यावेळी ६ ते ७ भटक्या कुत्र्यांच्या टोळीने त्यांना घेरलं. शोभा यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी दगड उचलून कुत्र्यांना पळवण्याचा प्रयत्न केला, पण कुत्र्यांच्या हिंसक झुंडीपुढे त्यांची झुंज अपयशी ठरली.

तोंड आणि मानेचे तोडले लचके

advertisement

[video width="738" height="554" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/pune-2026-03-d7976b4e566244ef7bf2bc85ee9474d9.mp4"][/video]

कुत्र्यांनी शोभा यांच्या हात, पाय, तोंड आणि मानेचा अक्षरशः लचका तोडला. या भीषण हल्ल्यात प्रचंड रक्तस्त्राव झाला आणि अवघ्या १५ मिनिटांतच त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी त्यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्याने परिसरात सुरुवातीला खून किंवा अत्याचाराचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर कुत्र्यांच्या हल्ल्याचे भीषण वास्तव समोर आलं.

advertisement

चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून नसबंदी केली जात आहे. शहरातील ६०० पैकी ४०० कुत्र्यांचं लसीकरण झाल्याचा ही दावा केला जातोय, मग कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस कशी काय वाढतंच चालली आहे? दुसरीकडे या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांचं काय? एका महिलेचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर ही चाकण नगरपरिषदेकडे उपस्थित प्रश्नांची उत्तरं नाहीत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षला 12000 रुपये भाव, लिंबू दरही तेजीत, कांद्याची काय स्थिती? Video
सर्व पहा

मूळच्या नांदेड जिल्ह्यातील एकलारा गावच्या असलेल्या शोभा गेल्या सहा महिन्यांपासून चाकणमध्ये एकट्याच राहत होत्या. चाकण औद्योगिक वसाहतीत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. आता तरी प्रशासन जागं होणार का? आणि या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाणार का? असा सवाल चाकणकर विचारत आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
मान, चेहरा आणि पायाचे लचके तोडले, 15 मिनिटांत शोभाने सोडला जीव, आधी खून वाटला; CCTV पाहिल्यावर पोलीसही हादरले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल