पुणे : पुणे शहरात अनेक जुन्या गोष्टी या पाहायला मिळतात. यामध्ये वाडे वास्तूचा समावेश होतो. मासे हे अनेकांना बघायला आवडतात. तर काही जण आपल्या घरामध्ये फिश टँकदेखील ठेवत असतात. पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यान मत्स्यालय येथे तुम्हाला अनेक प्रकारचे मासे बघायला मिळतात. हे जवळपास 70 वर्ष जुने मत्स्यालय आहे. याठिकाणी नेमके कुठले मासे आहेत, नेमकी याठिकाणची रचना कशी आहे, याबाबतचा हा आढावा.
advertisement
ऑगस्ट 1953 मध्ये या मत्स्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. गोडया पाण्यातील आणि शोभिवंत मासे इथे पाहयला मिळतात. माशांच्या वाढीसाठी त्यांना योग्य आहार दिला जातो व माशांच्या वेगवेगळ्या प्रजाती बघायला मिळतात. यामध्ये सिल्व्हर शार्क, कॉर्पस, सिलव्हर डॉलर, लाल पोपट सिचलिड्स, सेनेगल, टिनो फॉईल बार्ब, ऑक्सर, बँडेड लेप्रोनिस, सर्पीन टेट्रा, अरवाना, लाल डोळा टेट्रा, जांयट गौरामी, पाकू पिरान्हा, टायगर शार्कस, सोन्याचा मासा, मगर गार, डिस्कस, गौरामी, आशियाई, plover हॉर्न, मोली, सकर कॅट फिश, सिव्हरिम अशा जवळपास 25 हुन अधिक प्रकार इथे आहेत.
रक्तातली साखरेची पातळी चुकूनही वाढणार नाही, फक्त दररोज चघळा ही हिरवी पाने, VIDEO
मुंबईमधील जे तारापोरेवाला मत्स्यालय आहे, त्याप्रमाणे हे मत्स्यालय पाहायला मिळते. एकाच ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचे मासे हे बघता येतात. त्यामुळे दरवर्षी साधारण 1 लाखापर्यंत नागरिक हे मत्स्यालय बघण्यासाठी येत असतात. सकाळी 8.30 ते 11 आणि दुपारी 4.30 ते 8.30 या वेळामध्ये हे मत्स्यालय सुरू असते. तर लहान मुलांना 10 रुपये आणि प्रौढांना 20 रुपये तिकीट दर हे आकारले जातात. तसेच अनेक शाळकरीमुले तसेच इतर लोकदेखील मोठ्या संख्येने याठिकाणी हे मत्स्यालय बघण्यासाठी येत असतात, अशी माहिती मत्स्य पर्यवेक्षक अभय कलगुडे यांनी दिली.