अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रमोद निम्हण हे निवडणूक लढवण्यास इच्चुक होते. निवडणुकीसाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली होती. मात्र ऐनवेळी पक्षाने बाबुराव चांदेरे यांना उमेदवारी देण्यात आली. या अचानक झालेल्या बदलामुळे नागरिकांना तीव्र संताप व्यक्त केला आणि बाबुराव चांदेरे यांच्या उमेदवारीला विरोध केला.चांदेरे यांना तिकीट देण्याच्या निर्णयाचा ग्रामस्थांनी निषेध केला. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत संतप्त भावना पोहोचवण्यासाठी आणि प्रमोद निम्हण यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी नागरिकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीही उत्स्फूर्तपणे हा बंद पाळला आहे.
advertisement
काय म्हणाले प्रमोद निम्हण?
जनतेचा आवाज दाबता येत नाही… न्यायासाठीची लढाई थांबणार नाही! असे म्हणत ब प्रमोद निम्हण यांनी देखील समाज माध्यमांवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. प्रमोद निम्हण म्हणाले, जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारे प्रमोद निम्हण यांच्या समर्थनार्थ आज पाषाण परिसरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे कडकडीत बंद पाळत आपला ठाम निषेध नोंदवला.हा बंद म्हणजे केवळ आंदोलन नाही, तर अन्यायाविरोधातील लोकशक्तीचा आवाज आहे. पाषाणमधील नागरिकांनी शांततेच्या मार्गाने एकजूट दाखवत लोकशाही मूल्यांवरचा आपला विश्वास पुन्हा अधोरेखित केला.या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार. जनतेच्या भावना, न्याय आणि सत्याच्या बाजूने आम्ही सदैव ठामपणे उभे राहू.
अजित पवार नाराजी कशी दूर करणार?
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाषाण परिसररातील सर्व दुकाने बंद आहे. अचानक पुकारल्याने या बंदामुळे पुण्यात मोठ खळबळ उडाली असून अजित पवार नाराजी कशी दूर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
