मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरातील हॉटेलच्या भाड्यावरून संबंधित तरुणाचा आणि तडीपार गुंडांच्या टोळक्याचा वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर चार ते पाच तडीपार गुंडांनी एकत्र येत तरुणावर जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्रे किंवा अन्य वस्तूंचा वापर करून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणाला जबर दुखापत झाली असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि हल्लेखोरांचा शोध सुरू केला. पोलिसांनी केलेल्या तत्काळ कारवाईमध्ये हल्ल्यात सहभागी असलेल्या दोघांना अटक करण्यात यश आलं आहे. अटक करण्यात आलेले आरोपी तडीपार गुंडांच्या टोळीतील असल्याची माहिती समोर येत आहे.
हा हल्ला करणारे अन्य गुंड अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. हॉटेलच्या भाड्यासारख्या क्षुल्लक कारणावरून तडीपार गुंडांनी एवढा मोठा प्राणघातक हल्ला केल्यामुळे हिंजवडी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.