सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या 'बजाज पुणे ग्रँड टूर 2026' स्पर्धेत 65 वर्षीय बाळू आप्पा सोशल मीडियावर कमालीचे चर्चेत आले आहेत. त्यांची इन्स्टाग्रामवर रील तुफान व्हायरल होताना दिसत आहे. पुण्यातील या आप्पांचं पूर्ण नाव बाळू हिरामण जवंजाळ असं आहे. ते लहानपणापासूनच सायकलिंग करत असल्याचे म्हणाले. आपण सायकल चालवतो आणि गावोगावीचा प्रवास देखील सायकल वरूनच करतो, असं त्यांनी सांगितलंय. आज वयाच्या 65 व्या वर्षी देखील आपण दरोराज तब्बल 90 किलोमीटर सायकल चालवत असल्याचं बाळू अप्पांनी सांगितलय. आजच्या पिढीने मोबाईलमध्ये व्यस्त न राहता सायकलिंग करायला हवं असं मोलाचा सल्ला बाळू अप्पांनी दिलाय त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी...
advertisement
'न्यूज 18 मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, "मी माझ्या बालपणापासूनच सायकलिंग करतोय. आज माझं वय 70 आहे. वयाच्या सत्तरीमध्ये आहे, तरीही देखील मी सायकल चालवतो. सायकल चालवल्यामुळे आपली तब्येत व्यवस्थित राहते. कोणतीही व्याधी आपल्या पाठी लागत नाही. हल्लीच्या तरूणाईनेही सायकल चालवायला हवी. मोबाईलच्या अधीन न जाता त्यांनी सायकल चालवायला हवी. तरूणाईला बाईक चालवायला हवी, बाईक चालवल्यामुळे अवयव काही विशिष्ट वयानंतर दुखायला लागते. बदलत्या जीवनशैलीमुळे तरूणाईच्या पाठी दुखणं लागले आहे. मी कुठेही माझी सायकल घेऊनच जातो. मी केव्हा दुचाकी किंवा इतरत्र वाहनाचा वापर करत नाही. त्यामुळे माझी तब्येत आजही ठणठणीत आहे. सायकलिंग करताना मला एक वेगळाच आनंद मिळतो. सायकलिंगमुळे कोणतेही प्रदुषण होत नाही. प्रत्येकाने आवश्य सायकलिंग करायला हवी."
