TRENDING:

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! बाणेर-पाषाण 'मिसिंग लिंक'चा वनवास संपणार! 33 वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याबाबत मोठी अपडेट

Last Updated:

बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा बाणेर-पाषाण लिंक रोड लवकरच वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा बाणेर-पाषाण लिंक रोड लवकरच वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या 1.2 किमी लांबीच्या रस्त्यातील केवळ 200 मीटरचा तुकडा भूसंपादनामुळे 33 वर्ष रखडला होता. आता महापालिकेने या उर्वरित कामासाठी कंत्राटदार नेमण्याची हालचाल सुरू केल्याने स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बाणेर-पाषाण लिंक रोड लवकरच वाहतुकीसाठी खुला (प्रतिकात्मक फोटो)
बाणेर-पाषाण लिंक रोड लवकरच वाहतुकीसाठी खुला (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

तीन दशकांचा संघर्ष

१९९२ मध्ये या रस्त्याचा प्रस्ताव पहिल्यांदा मंजूर झाला. २०१४ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली, मात्र भूसंपादनाच्या अडचणींमुळे काम मंदावले. भूसंपादनातील गुंतागुंतीमुळे काम रखडले. तसेच येथे गृहनिर्माण सोसायट्या मोठ्या प्रमाणात झाल्याने आणि पर्यायाने वाहतूक वाढल्याने हा रस्ता करणे क्रमप्राप्त होते. २०२१ मध्ये'बाणेर-पाषाण लिंक रोड वेल्फेअर ट्रस्ट'ने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने महापालिकेला कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचे आदेश दिल्यानंतरही कामात विलंब झाल्याने एप्रिल २०२५ मध्ये कठोर भूमिका घेत दोन महिन्यांत भूसंपादन आणि चार महिन्यांत रस्ता पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

advertisement

Pune News: पुण्यात हत्याराचा धाक दाखवून दुचाकी चोरली; काही अंतर जाताच चोरट्यांसोबतच घडलं भयंकर

२५ कोटींचा निधी जमा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, फक्त 3 हजारांत सुरू केला दागिन्यांचा व्यवसाय, आता सिद्धीची लाखांत कमाई, Video
सर्व पहा

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले २५ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे भूसंपादनासाठी जमा केले आहेत. शहरातील ३३ 'मिसिंग लिंक'पैकी हा एक महत्त्वाचा रस्ता असून, चालू वर्षात पूर्ण होणाऱ्या १२ रस्त्यांच्या यादीत याचा समावेश आहे. जमीन ताब्यात मिळताच तातडीने रस्तेबांधणी पूर्ण केली जाणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! बाणेर-पाषाण 'मिसिंग लिंक'चा वनवास संपणार! 33 वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याबाबत मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल