शुक्रवारी सायंकाळच्या वेळेस व्यायामासाठी जात असताना पाठीमागून आलेल्या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली होती. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. डोक्याला मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. प्रथम त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुन्हा बारामतीत उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत त्यांनी उत्तम कामगिरी केली होती. पुणे जिल्ह्यातील यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पाटस पोलिस चौकीत सध्या ते कार्यरत होते. अनेक गुन्ह्यांच्या उकलीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. अतिशय धाडसी पोलिस कर्मचारी म्हणून त्यांची पोलिस दलात ओळख होती.
advertisement
वाचा - पोटापाण्यासाठी महाराष्ट्रात आले, पुण्यात पोहोचताच तिघांसोबत भयानक घडलं, मृत्यू
या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून त्या मध्ये संदीप कदम हे रस्त्याच्या कडेने जाताना मागून आलेल्या टेंपोने त्यांना जोरदार धडक दिल्याचे दिसत आहे. हा अपघात होता की घातपात आहे, या बाबत पोलिसांनी सखोल तपास करावा अशी मागणी होत आहे. संदीप कदम यांनी अनेक गुन्ह्यांची उकल करत अनेक गुन्हेगारांना गजाआड केलेले होते, गुन्हे शोध पथकात काम करताना त्यांची कामगिरी चमकदार होती, या पार्श्वभूमीवर हा अपघात की घातपात याची चर्चा बारामती सुरु आहे.
