पोटापाण्यासाठी MP मधून महाराष्ट्रात आले, पुण्यात पोहोचताच तिघांसोबत भयानक घडलं, जागीच मृत्यू

Last Updated:

कल्याण-नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील दत्त मंदिराजवळ असलेल्या कठेश्वरी पुला लगत भरधाव कारने 5 परप्रांतीय मजुरांना चिरडलं. या घटनेत 2 जण जागीच ठार झाले, तर 1 व्यक्ती उपचारादरम्यान मयत झाला आहे.

अपघातात तिघांनी गमावला जीव
अपघातात तिघांनी गमावला जीव
रायचंद शिंदे, पुणे 25 सप्टेंबर : अपघाताच्या अनेक घटना राज्यातून दररोज समोर येत असतात. यातील काही अपघात इतके भीषण असतात की त्यात लोकांना आपला जीव गमवावा लागतो. आता अशाच एका भीषण अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे. यात कल्याण-नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील दत्त मंदिराजवळ असलेल्या कठेश्वरी पुला लगत भरधाव कारने 5 परप्रांतीय मजुरांना चिरडलं. या घटनेत 2 जण जागीच ठार झाले, तर 1 व्यक्ती उपचारादरम्यान मयत झाला आहे.
घटनेत इतर 2 जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर येत आहे. डिंगोरे येथे मध्यप्रदेशमधून दोन-तीन दिवसांपूर्वीच काही शेतमजूर कामासाठी आले होते. त्यातील हे मजूर होते.
रविवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास कल्याणवरून ओतूरच्या दिशेनं येणाऱ्या भरधाव कारने (एम.एच.12 व्ही.क्यु.8909) महामार्गावरील पायी चालत असलेल्या पाच परप्रांतीय मजुरांना जोरदार धडक दिली. या अपघातात जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले या तिघांनी आपला जीव गमावला आहे. तर दिनेश जाधव आणि विक्रम तारोले हे दोघं गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
advertisement
घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे एपीआय सचिन कांडगे यांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना मदत केली. गेल्या चार-पाच दिवसात कल्याण महामार्गावर वारंवार अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की काय? अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. गावालगत गतिरोधक बसवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पोटापाण्यासाठी MP मधून महाराष्ट्रात आले, पुण्यात पोहोचताच तिघांसोबत भयानक घडलं, जागीच मृत्यू
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement