नवी मुंबईत भीषण अपघात; कारची पोलिसांच्या गाडीसह चार वाहनांना धडक

Last Updated:

नवी मुंबईतून अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. चारचाकी वाहनाने एका पोलिसांच्या गाडीसह तीन ते चार वाहनांना धडक दिली.

News18
News18
नवी मुंबई, 24 सप्टेंबर, प्रमोद पाटील : नवी मुंबईतून अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. कारनं एका पोलिसांच्या गाडीसह तीन ते चार गाड्यांना धडक दिली. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. संबंधित वाहनाच्या चालकाविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नवी मुंबईतील पाम बीचवर मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अंदाजे दोन वाजता भरधाव वेगानं येणाऱ्या कारनं पोलिसांच्या गाडीसह तीन ते चार गाड्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. पेट्रोलिंग करताना रस्त्याच्या कडेला पडलेल्या दोन व्यक्तींना उचलण्यासाठी पोलिसांनी गाडी उभी केली होती. याच दरम्यान मागून आलेल्या कारनं पोलिसांच्या वाहानाला धडक दिली.
advertisement
वाहनांचं नुकसान 
या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी देखील वाहनांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला आहे. पोलिसांनी या अपघात प्रकरणात चालकाविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
नवी मुंबईत भीषण अपघात; कारची पोलिसांच्या गाडीसह चार वाहनांना धडक
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement