कोथरूड पोलिसांची परवानगी असताना देखील खासदार मेधा कुलकर्णी यांनी तक्रार करत कार्यक्रम बंद केला. कार्यकर्त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप युवकांनी केला आहे. भाजप खासदारानेच श्रीराम जयंती निमित्त कार्यक्रम बंद पाडल्याने श्रीराम भक्त नाराज असल्याची चर्चा आहे. याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. पोलिसांकडून लाठीचार झाल्याने कार्यकर्तेही संतापले होते. तर व्हिडिओ काढणाऱ्या युवकालाही अरेरावीची भाषा करण्यात आली. व्हिडीओ काढणाऱ्या अनेकांचे मोबाईल महिला खासदारांनी ताब्यात घेतल्याचे युवकांनी म्हटले आहे.
advertisement
तर दुसरीकडे लाठीचार्ज केला नसल्याचा खुलासा पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी केला आहे. अद्यापतरी कोणाविरूद्धही एफआयआर दाखल नाही. खासदार महोदयांनी पोलीसांच्या कामात हस्तक्षेप केल्याचाही आरोप कार्यकर्ते करत आहेत. रामनवमीच्या मिरवणुकीत सिनेमाची गाणी लावल्याने खासदार मेधा कुलकर्णी भडकल्याने कार्यक्रम बंद पाडल्याचे बोलले जात आहे.