TRENDING:

Pune News : पुणेकरांना दिलासा! वाहतूक कोंडीत होणार मोठा बदल, असा आहे नवीन प्लॅन?

Last Updated:

Pune : पुणेकरांना वाहतुकीच्या कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनांनुसार शहरातील रस्त्यांचे विस्तार, नवीन उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि पर्यायी रस्त्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ठोस पावले उचलली आहेत. रविवारी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत पुणे-सातारा महामार्गावरील भुयारी मार्गांची रुंदी वाढवण्याबाबत तसेच आवश्यक ठिकाणी नवीन भुयारी मार्ग तयार करण्याबाबत सूचनाही दिल्या. यामुळे या महामार्गावरील वाहतुकीची गती वाढेल आणि गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
News18
News18
advertisement

त्याचसोबत भूगाव बाह्यवळण मार्गाचा कार्यादेशही मंजूर करण्यात आला आहे. चांदणी चौक ते ताम्हिणी घाट रस्त्यादरम्यान हा मार्ग तयार केला जाणार असून त्याचे काम नऊ महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित आहे. हा मार्ग साधारण 18 मीटर रुंद आणि 867 मीटर लांबीचा असेल. यासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरणाने (PMRDA)93 टक्के आवश्यक जागा संपादित करून दिली असून उर्वरित आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले. भूगाव बाह्यवळण मार्गाचे पूर्ण झाल्यानंतर शहराच्या वाहतुकीवर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होईल तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवरील कोंडी कमी होण्यास मदत होईल.

advertisement

गडकरींकडे पुण्यातील चार महत्त्वाच्या मागण्याही मांडण्यात आल्या. पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाढत्या वाहनसंख्येमुळे बाणेर, राधा चौक, म्हाळुंगे आणि सूस गावातील रस्त्यांवर प्रचंड कोडी निर्माण होत आहे. हिंजवडी आयटी पार्ककडून पुण्याकडे येणारी वाहने आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक या ठिकाणी अडकून पडतात. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी गडकरी यांना सविस्तर निवेदन सादर केले.

advertisement

त्यात प्रस्तावित चार मुख्य उपाय योजले आहेत:

माण आणि हिंजवडीकडून येणाऱ्या वाहनांना पुण्यात सहज प्रवेश मिळावा यासाठी मर्सिडीज बेंझ शोरूमजवळ भुयारी मार्ग तयार करणे.

बाणेर पॅनकार्ड रस्त्यावरून सूसच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी बिटवाइज कंपनीजवळ उड्डाणपूल उभारणे.

म्हाळुंगे गावातून येणाऱ्या वाहनांना थेट बालेवाडी मार्गे पुण्यात प्रवेश मिळावा यासाठी सुमनकीर्ती मारुती सुझुकी शोरूमजवळ आणखी एक उड्डाणपूल उभारणे.

advertisement

या प्रकल्पांवर सकारात्मक निर्णय घेऊन शहरातील वाहतुकीची सुरळीत व्यवस्था सुनिश्चित करणे.

गडकरी यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असून पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी लवकरच योग्य ती कामे सुरू होण्याची शक्यता आहे. या उपाययोजनांमुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि वाहतूक व्यवस्थेत दीर्घकालीन सुधारणा होईल.

मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुणेकरांना दिलासा! वाहतूक कोंडीत होणार मोठा बदल, असा आहे नवीन प्लॅन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल