नेमका वाद कशावरून झाला?
फिर्यादी रितेश सुरेश उजबळे (२३, मूळ रा. लातूर, सध्या रा. चाकण) हे बुधवारी दुपारी राणुबाई मळा परिसरात असताना ही घटना घडली. आरोपींपैकी सचिन पवार याने रितेशला "संख्या" नावाचा मुलगा कुठे आहे, अशी विचारणा केली. रितेशने आपल्याला त्याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगताच आरोपींचा पारा चढला. माहिती लपवत असल्याचा संशय घेऊन त्यांनी रितेशला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
advertisement
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपी सचिन पवारने जवळच पडलेला एक मोठा दगड रितेशच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात रितेशचे डोके फुटून तो रक्ताळला, त्याला उपचारादरम्यान दोन टाके पडले आहेत. यावेळी सचिनसोबत असलेल्या ऋषिकेश भोईर आणि सौरभ पवार या दोघांनीही रितेशला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या हल्ल्यानंतर रितेशने चाकण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी ऋषिकेश बापूसाहेब भोईर, सौरभ गंगाधर पवार आणि सचिन गंगाधर पवार या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. किरकोळ कारणावरून तरुणावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
