TRENDING:

तो पत्नीला भेटायला गुजरातला निघाला, पण तो एक कॉल अन् प्रतिकनं पुण्यातच संपवलं आयुष्य

Last Updated:

या दाम्पत्यामध्ये गेल्या काही काळापासून सतत खटके उडत होते. बुधवारी प्रतीक आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी गुजरातला जाण्याच्या तयारीत होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी-चिंचवड : संसारातील किरकोळ भांडण किती भयंकर वळण घेऊ शकतं, याचा एक धक्कादायक प्रत्यय चिखली परिसरात आला आहे. पत्नीशी फोनवर वाद झाल्यानंतर एका २३ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. प्रतीक संदीप घनवटे असे या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे.
तरुणाची आत्महत्या (AI Image)
तरुणाची आत्महत्या (AI Image)
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक याची पत्नी काही दिवसांपासून गुजरात येथे होती. या दाम्पत्यामध्ये गेल्या काही काळापासून सतत खटके उडत होते. बुधवारी प्रतीक आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी गुजरातला जाण्याच्या तयारीत होता. जाण्यापूर्वी त्याने पत्नीशी फोनवरून संवाद साधला. मात्र, या संवादादरम्यान पुन्हा एकदा जुन्या कारणांवरून त्यांच्यात जोरदार वाद झाला.

कर्वेनगरमध्ये मृत्यूचा सापळा! दुचाकीस्वाराचा चालत्या गाडीवर अचानक चर्रकन चिरला गळा अन् रस्त्यावर रक्ताचा सडा, पुण्यात खळबळ

advertisement

क्षणाचा राग ठरला जीवघेणा

फोनवरील वादाने प्रतीक इतका व्यथित झाला की, त्याने रागाच्या भरात टोकाचा निर्णय घेत विष प्राशन केले. प्रकृती बिघडल्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अवघ्या २३ व्या वर्षी प्रतीकने उचललेल्या या पावलामुळे घनवटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

आत्महत्येचे नेमके आणि सविस्तर कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी, प्राथमिक तपासात घरगुती वादातून हे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
तो पत्नीला भेटायला गुजरातला निघाला, पण तो एक कॉल अन् प्रतिकनं पुण्यातच संपवलं आयुष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल