पुणे: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहे. या प्रकरणी आतापर्यंत अल्पवयीन मुलाच्या वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची गुन्हे दाखल करण्यात आली आहे. पण आता अल्पवयीन आरोपीच्या आईला शिवानी अग्रवालला अटक करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवानी अग्रवाल सध्या गायब असल्याचं कळतंय. ससून हॅास्पिटलमधील डॅाक्टरांवर दबाव टाकण्यासाठी शिवानी अग्रवाल ससून रूग्णालयात स्वतः हजर होती अशी सूत्रांची माहिती आहे.
advertisement
पुणे पोलिसांनी अग्रवाल कुटुंबीयांची कसून चौकशी करत आहे. पुणे पोलिसांनी आता अग्रवाल कुटुंबियांचे पासपोर्ट जप्त केले आहे. विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि त्यांचा मोठा मुलगा आणि अल्पवयीन आरोपीचा पासपोर्ट ही जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी अग्रवालला यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. ज्या दिवशी अपघात घडला तेव्हा शिवानी अग्रवाल या ससून हॉस्पिटलमध्ये हजर होत्या, अशी माहिती समोर आली आहे. तसंच त्यांनी डॉक्टरांवर दबाव टाकल्याचाही आरोप आहे. पण सध्या शिवानी अग्रवाल या गायब आहे. पोलीस शोध घेत आहे.
विशाल अग्रवालचे आमदार टिंगरेंना 45 तर डॉक्टर तावरेला 15 कॉल
दरम्यान, या प्रकरणात डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात व्हॉटसअप कॉलवर संभाषण झाल्याची माहिती समोर येत आहे. विशाल अग्रवालने आधी आमदार सुनील टिंगरे यांना फोन केले होते. त्यानंतर अजय तावरेला फोन केला. अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात १५ व्हॉटसअप कॉल झाले असून यात नेमकं काय बोलणं झालं? रक्ताचे नमुने बदलण्यासाठी लाच दिली गेली का? याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या रात्री सुनील टिंगरे यांना विशाल अग्रवालचे 45 मिस्ड कॉल आले होते. हे मिस्ड कॉल्स पहाटे 2.30 - 3.45 च्या दरम्यान होते. सुनील टिंगरे पहाटे ३.४५ च्या सुमारास येरवडा पोलीस ठाण्यात आले. त्यादिवशी टिंगरे झोपले होते आणि मिस्ड कॉल्स अनुत्तरीत होते हे लक्षात घेऊन विशाल अग्रवाल त्याला घेण्यासाठी टिंगरे यांच्या घरी गेला. त्यानंतर टिंगरे रविवारी पहाटेपर्यंत पोलिस ठाण्यात हजर होते.
