नेमकी घटना काय?
सेंट सेबॅस्टियन हायस्कूलच्या मागील बाजूला रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते. आर्यनची आई या कामावर मजूर म्हणून काम करत होती. काम सुरू असताना रोडरोलरचा चालक अतिशय वेगाने रोलर चालवत होता. रोलरच्या वेगाबाबत स्थानिक नागरिकांनी चालकाला हटकले देखील होते, मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. काम संपवत असताना अचानक आर्यन या रोलरखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
अर्धा तास मृतदेह घटनास्थळी: अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. आपल्या डोळ्यादेखत पोटचा गोळा गेल्याने आईला मोठा मानसिक धक्का बसला आहे. अपघाताच्या तीव्रतेमुळे आर्यनचा मृतदेह तब्बल अर्धा तास घटनास्थळीच पडून होता. अखेर दौंड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, सार्वजनिक कामांच्या ठिकाणी मजुरांच्या लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.
