advertisement

Success Story : नोकरी गेली पण हार नाही मानली, लोणचे व्यवसायाने दिला नवा आधार, वर्षाला 10 लाख कमाई

Last Updated:

दहा किलोपासून आई लोणचे नावाने सुरू केलेल्या व्यवसायाची उलाढाल आजच्या घडीला 600 क्विंटल लोणचे विक्रीपर्यंत पोहोचली आहे.

+
कोरोनात

कोरोनात नोकरी गेली, ‘आई लोणचे’ने दिला नवा आधार; गावातून दिल्ली-मुंबईपर्यंत 30 ला

छत्रपती संभाजीनगर: खुलताबाद तालुक्यातील गडाणा गावातील रेखा चव्हाण या 2018 पासून आंबा कैरी, लिंबू आणि मिरची अशा तीन प्रकारचे लोणचे बनवण्याचे काम करतात. याबरोबरच हे बनवलेले लोणचे त्या विक्री देखील करतात. होम डिलिव्हरी असो, तसेच त्या ऑनलाईन लोणच्याच्या सर्व सेवा पुरवतात. दहा किलोपासून आई लोणचे नावाने सुरू केलेल्या व्यवसायाची उलाढाल आजच्या घडीला 600 क्विंटल लोणचे विक्रीपर्यंत पोहोचली आहे. वर्षाला या माध्यमातून 30 लाखांची उलाढाल तर 10 लाख निव्वळ कमाई होत असल्याचे रेखा चव्हाण यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
व्यवसायाला सुरुवात कशी झाली?
रेखा चव्हाण सांगतात की, गडाना येथे लोणचे व्यवसायाची सुरुवात कोरोना काळात झाली. त्यावेळी माझा जॉब देखील गेला होता. कोरोना काळात भरपूर काही शिकायला मिळालं, त्यामुळे काहीतरी व्यवसाय सुरू करावा ही कल्पना मनात होती. लोकांना घरगुती पदार्थ खायला आवडतात आणि माझी आई चांगल्या प्रकारचं लोणचं बनवायच्या. तेव्हा कोरोना काळ असल्यामुळे, शेतामध्ये बचत गटाची मीटिंग होती. त्यावेळी संपूर्ण बचत गटाची टीम त्या ठिकाणी आली होती. मीटिंग झाल्यानंतर सर्वजण जेवायला बसले त्यावेळी घरून एका छोट्या भरणीमध्ये आईने बनवलेले लोणचे मी सोबत नेले होते आणि ते सर्वांनी खाल्ले आणि आवडले, त्यामुळे तिथे मात्र लोणचे व्यवसायाची कल्पना पक्की झाली.
advertisement
दिल्ली-मुंबईला लोणचे पार्सल
लोणचे बनवण्याचा व्यवसाय सुरू झाल्यानंतर, छोटे-छोटे लोणचे पॅक तयार केले. तेव्हा पॅकिंगबद्दल माहितीही नव्हती, त्यामुळे किराणा दुकानातून छोट्या भरणी आणल्या आणि त्यामध्ये लोणचे भरले आणि ते लोणचे टेस्टिंगसाठी खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर ऐवजी पुणे, मुंबई आणि दिल्ली येथे पाठवले. या सर्व ठिकाणी नातेवाईक आणि मित्रपरिवार राहत असल्यामुळे त्यांच्या सहाय्याने ते लोणचे त्या ठिकाणी पाठवण्यात आले.
advertisement
महिलांनी लोणचे व्यवसाय कसा सुरू करावा?
नवीन व्यवसाय क्षेत्रात येणाऱ्या महिलांना, लोणचे उत्पादन आणि विक्री व्यवसायात यायचे झाल्यास त्यांनी व्यवसायाची संपूर्ण माहिती घ्यावी. बनवलेले लोणचे कुठे विकणार? तो बाजार ठरवणं, सुरुवातीला वीस ते पंचवीस टक्के नफा मिळतो. एकदाच कुठेही नफा मिळणार नाही, टप्प्याटप्प्याने पुढे जाता येते. लोणचे पॅक करताना स्टिकरवर तारीख देणे महत्त्वाचे असते.
advertisement
लोणचे कधी बनवले आणि कधी एक्सपायर होणार याचा उल्लेख असणे आवश्यक आहे. त्यासाठी छोटे यंत्र बाजारात मिळते तसेच वजन काटा लागतो. याबरोबरच सीलिंग मशीन आणि लोणचे साठवणुकीसाठी खाद्य साठवणुकीचे वेगळे ड्राम असतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो आणि काही कालांतराने उत्पादन आणि विक्री वाढल्यानंतर हा खर्च वाढूही शकतो, असे देखील चव्हाण यांनी म्हटले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : नोकरी गेली पण हार नाही मानली, लोणचे व्यवसायाने दिला नवा आधार, वर्षाला 10 लाख कमाई
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement